रॉयल एनफिल्ड आणतेय नवीन बाईक; 6 नोव्हेंबरला पडदा उठणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 04:27 PM2018-10-31T16:27:31+5:302018-10-31T16:28:19+5:30
सोशल मिडियावर कंपनीने एका बाईकचा काळे कापड टाकलेला फोटो शेअर करत सस्पेंन्स कायम ठेवला आहे.
भारतीयांची धाकड बाईक बुलेटचे निर्माण करणारी कंपनी रॉयल एनफिल्ड 14 नोव्हेबरला दोन बाईक इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेन्टल 650 भारतात लाँच करणार आहे. मात्र, त्याआधीच दिवाळीच्या दिवशी सुखद धक्का देणार आहे. सोशल मिडियावर कंपनीने एका बाईकचा काळे कापड टाकलेला फोटो शेअर करत सस्पेंन्स कायम ठेवला आहे.
रॉयल एनफिल्ड इटलीतील मिलानमध्ये होणाऱ्या मोटरसायकल शो 2018 मध्ये या मोटरसाकलला दाखविणार आहे. याबाबतची माहीती कंपनीने आपल्या ट्विटर हँडलवर दिली आहे.
6.11.2018, LIVE from #EICMA2018. Block your dates!#RidePure#PureMotorcyclingpic.twitter.com/fhFBACysNC
— Royal Enfield (@royalenfield) October 30, 2018
या मोटारयाकलबाबत EICMA मोटर शोमध्ये पडदा हटल्यानंतरच समजणार आहे. फोटो पाहून असे दिसत आहे की, बाईक सिंगल सीटवाली आहे आणि ती ट्रायम्फ बॉम्बरसारखी दिसते. आता या बाईकमध्ये कंपनी जुने 350/500 सीसी इंजिन देते की नवीन 650 सीसी इंजिन देते ते पहावे लागेल.