'एनफिल्ड'चा 'रॉयल' कारभार, लॉन्च झाली दमदार Bullet; पाहा फीचर्स अन् किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 03:36 PM2023-09-01T15:36:41+5:302023-09-01T15:37:33+5:30
Royal Enfield ने आपली नवीन Bullet 350 लॉन्च केली आहे. जाणून घ्या फीचर्स...
Royal Enfield Bullet 350: भारतीय तरुणांमध्ये रॉयल एनफिल्डच्या लोकप्रिय बुलेट 350 बाईकची वेगळीच क्रेझ आहे. हीच क्रेझ पाहता कंपनीने या प्रसिद्ध बाईकचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल भारतीय बाजारात लॉन्च केले आहे. आकर्षक लुक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या या बाईकमध्ये कंपनीने अनेक मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे ही पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे. या बाईकची किंमत 1.74 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.
Royal Enfield ने नवीन Bullet 350 मध्ये एस्थेटिक आणि मॅकेनिकल अपडेट्स दिले आहेत. ही कंपनीची सर्वात परवडणारी बाईक असून, याचा इतिहास अनेक दशके जुना आहे. विशेष म्हणजे, या मॉडेलचे नाव ब्रँडपेक्षा जास्त प्रसिद्ध आहे. आजही अनेक भागातील लोक कंपनीचे नाव बुलेट समजतात.
नवीन बुलेट 350 कशी आहे:
Royal Enfield ने चेन्नईमध्ये आपली नवीन Bullet 350 लॉन्च केली. कंपनीने ही बाईक नवीन 'J' प्लॅटफॉर्मवर विकसित केली आहे, ज्यावर तुम्हाला नवीन हंटर आणि मेटिअर सारखे मॉडेल्स मिळतात. कंपनीने या बाईकमध्ये 349 cc क्षमतेचे सिंगल-सिलेंडर, लाँग-स्ट्रोक इंजिन दिले आहे. हे 6,100 rpm वर सुमारे 19.9 bhp पॉवर आउटपुट आणि 4,000 rpm वर 27 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.
Royal Enfield च्या नवीन Bullet 350 मध्ये हेडलाइट्स आणि टेललाइट्सचा नवीन सेट देण्यात आला आहे. कंपनीने या बाइकला पूर्वीसारखा रेट्रो लुक दिला आहे. तसेच, यात एलसीडी स्क्रीनसह नवीन डिजिटल-अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. याच्या स्विचगियरमध्येही बदल करण्यात आले आहेत. तसेच, याबाईकमध्ये यूएसबी पोर्टही आहे.