'Royal' रायडर्सना मोठा झटका; Classic 350 च्या शाही सवारीसाठी खर्च करावी लागणार अधिक रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 07:16 PM2021-07-08T19:16:50+5:302021-07-08T19:17:42+5:30

Royal Enfield नं आपल्या बाईकच्या किंमतीत केली मोठी वाढ. Classic 350 ही आहे रॉयल एन्फिल्डची बेस्ट सेलिंग बाईक.

Royal Enfield Classic 350 crosses rs 2 lakh price mark after latest price hike know more details | 'Royal' रायडर्सना मोठा झटका; Classic 350 च्या शाही सवारीसाठी खर्च करावी लागणार अधिक रक्कम

'Royal' रायडर्सना मोठा झटका; Classic 350 च्या शाही सवारीसाठी खर्च करावी लागणार अधिक रक्कम

Next
ठळक मुद्देRoyal Enfield नं आपल्या बाईकच्या किंमतीत केली मोठी वाढ.Classic 350 ही आहे रॉयल एन्फिल्डची बेस्ट सेलिंग बाईक.

देशातील प्रमुख वाहन उत्पादक कंपनी  Royal Enfield नं आपल्या बाईक्सच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. ग्राहकांना  Royal Enfield चं Classsic 350 हे मॉडेल खरेदी करण्यासाठी आता आधिक पैसे मोजावे लागणार आहेत. दरवाढीनंतर या बाईकची किंमत आता २ लाखांच्या वर गेली आहे. कंपनीनं या बाईकच्या किंमतीत 7,361 रुपयांपासून 8,362 रुपयांची वाढ केली आहे. 

नव्या दरवाझईनंतर Classic 350 च्या एन्ट्री लेव्हल व्हेरिअंटची अॅश, चेस्टनन रेज, रेडिट्झ रेड, प्योर ब्लॅक आणि मर्क्युरी सिल्व्हर सिंगल चॅल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) ची सुरूवातीची किंमत 1,79,782 रूपये (एक्स शोरूम) इतकी झाली आहे. तर स्टिल्थ ब्लॅक आणि क्रोम ब्लॅक व्हेरिअंटची किंमत 2,06,962 रूपये (एक्स शोरूम) इतकी झाली आहे. 

कंपनीनं किंमतीत वाढ केली असून बाईकमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. रॉयल एन्फिल्डनं नुकतंच आपल्या या बाईकचे नवे फीचर्स आणि तंत्रज्ञान बाजारात सादर केलं होतं. कंपनीनं या बाईकमध्ये 346cc क्षमतेच्या सिंगल सिलिंडरयुक्त एअर कुल्ड UCE इंजिनचा वापर केला आहे. हे इंजिन 19.3Ps ची पॉवर आणि 28Nm चा टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्ससह येतं. कंपनी सध्या देशांतर्गत बाजारपेठेत काही नवे मॉडेल्स आणण्याच्या तयारीत आहे. यामध्ये हंटर 350 आणि स्क्रॅम 350 सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे. 

Web Title: Royal Enfield Classic 350 crosses rs 2 lakh price mark after latest price hike know more details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.