लवकरच लॉन्च होणार Royal Enfield ची इलेक्ट्रिक बाईक; टीझर पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 10:00 PM2024-10-16T22:00:42+5:302024-10-16T22:04:10+5:30
Royal Enfield Electric Bike : 4 नोव्हेंबर 2024 रोजी ही बाईक लॉन्च होणार
Royal Enfield Electric Bike : भारतातील बाईक प्रेमींसाठी Royal Enfield च्या बाईक्स जीव की प्राण आहेत. रॉयल एनफिल्डच्या पोर्टफोलिओमध्ये एकापेक्षा एक दमदार बाईक्स आहेत. आता कंपनी जागतिक स्तरावर आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करणार आहे. कंपनीने यासाठी खास Royal Enfield EV Instagram हँडलदेखील तयार केले आहे, ज्यावर कंपनीने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक बाईकचा टीझर रिलीज केला आहे. ही इलेक्ट्रिक बाईक इटलीमध्ये होणाऱ्या EICMA मोटर शोमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. मात्र, या इलेक्ट्रिक बाईक बाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
कंपनीने रिलीज केला टीझर
रॉयल एनफिल्डने आपल्या इलेक्ट्रिक बाइकसाठी एक समर्पित इंस्टाग्राम हँडल तयार केले आहे. कंपनीने royalenfieldev वर टीझर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये ही इलेक्ट्रिक बाईक पॅराशूटद्वारे पृथ्वीवर उतरताना दिसत आहे. या पोस्टनुसार, ही इलेक्ट्रिक बाईक 4 नोव्हेंबर 2024 रोजी जागतिक स्तरावर लॉन्च केली जाईल. मात्र, ही बाईक भारतात लॉन्च होणार की नाही, याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.
कशी असेल रॉयल एनफिल्डची इलेक्ट्रिक बाईक ?
सध्या या बाईकबद्दल कंपनीकडून जास्त माहिती देण्यात आलेली नाही. 4 नोव्हेंबर 2024 रोजी ही बाईक लॉन्च केली जाऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, रॉयल एनफिल्डच्या इलेक्ट्रिक बाईकचे डिझाईन बॉबर शैलितील असू शकते. या बाईकमध्ये मोठी बॅटरी मिळू शकते, जी चांगली रेंज देण्यास सक्षम असेल. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये EICMA मोटर शोमध्ये या बाईकचे कॉन्सेप्ट मॉडेल सादर करण्यात आले होते.