Royal Enfield आणणार Electric Bike! पहिल्या फोटोची इंटरनेटवर धूम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 03:15 PM2022-11-23T15:15:32+5:302022-11-23T15:17:35+5:30

Royal Enfield electric bike images:  बाइकला इंटरनली 'Electric01' असे नाव देण्यात आले आहे.

royal enfield electric bike electrik01 first image leaked expected price driving range details | Royal Enfield आणणार Electric Bike! पहिल्या फोटोची इंटरनेटवर धूम

Royal Enfield आणणार Electric Bike! पहिल्या फोटोची इंटरनेटवर धूम

Next

नवी दिल्ली : रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) आपल्या बाइक लाइनअपमध्ये सतत सुधारणा करत आहे. कंपनीकडे 350 ते 650 सीसी सेगमेंटमधील अनेक बाइक्स उपलब्ध आहेत. दरम्यान रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बाइकची (Royal Enfield Electric Bike)चाहत्यांनी खूप दिवसांपासून वाट पाहिली असली तरी. आता या बाइकचा पहिला फोटो समोर आला आहे. बाइकला इंटरनली 'Electric01' असे नाव देण्यात आले आहे. बाइकची डिझाईन देखील युनिक असल्याचे दिसून येत आहे.

सध्या फोटोमध्ये बाइकचा फक्त पुढील भाग दिसत आहे. मात्र, यामुळे बाइकबाबत अनेक डिटेल्स समोर आले आहेत. यामध्ये निओ विंटेज/क्लासिक स्टाइलिंग दिसायला मिळते. फ्रंट सस्पेन्शन देखील जुन्या बाइकमध्ये वापरल्या जाणार्‍या प्रमाणेच आहे, ज्यामुळे बाइकला रेट्रो अपील मिळत आहे. तसेच, यामध्ये गोल आकाराचे हेडलाइट्स देण्यात आले आहेत. याशिवाय बाइकची फ्यूल टँक देखील पारंपारिक डिझाइनची आहे. बाइकची चेसिस देखील खूप आकर्षक आहे. ही दोन भागांत विभागली आहे आणि फ्यूल टँकच्या वरच्या आणि खालच्या दिशेने जाते. बाइकमध्ये अलॉय व्हील देखील स्पष्टपणे दिसू शकतात.

कधी लाँच होणार ही बाइक?
तुम्ही फोटोमध्ये पहात असलेली बाइक सुरुवातीच्या टप्प्यात आहे. मात्र, ही प्रत्यक्षात लाँच होण्यास बराच अवधी आहे. कंपनी याला QFD (क्वालिटी फंक्शन डेव्हलपमेंट) कॉन्सेफ्ट म्हणत आहे. कोणतीही बाइक लाँच करण्यापूर्वी रॉयल एनफिल्ड अनेकदा जास्त वेळ रोड टेस्टिंग करते. दरम्यान, कंपनीच्या पहिल्या इलेक्ट्रिक बाईकमध्ये निओ-रेट्रो स्टाइलिंग दिसेल, याची खात्री पटली आहे.

Web Title: royal enfield electric bike electrik01 first image leaked expected price driving range details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.