Hunter 350: कणखर अन् स्टायलिश! रॉयल एनफील्डची बहुप्रतिक्षीत Hunter 350 लॉन्च; किंमतही कमी, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 07:39 PM2022-08-07T19:39:50+5:302022-08-07T19:40:31+5:30

रॉयल एनफिल्डनं प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर हंटर 350 बाइक (Hunter 350) लॉन्च केली आहे. कंपनीनं ही बाईक रेट्रो आणि मेट्रो अशा दोन व्हेरिअंटमध्ये लॉन्च केली आहे.

royal enfield hunter 350 launched with 1 49 lakh rupees starting price and retro metro rebel variants | Hunter 350: कणखर अन् स्टायलिश! रॉयल एनफील्डची बहुप्रतिक्षीत Hunter 350 लॉन्च; किंमतही कमी, जाणून घ्या...

Hunter 350: कणखर अन् स्टायलिश! रॉयल एनफील्डची बहुप्रतिक्षीत Hunter 350 लॉन्च; किंमतही कमी, जाणून घ्या...

googlenewsNext

रॉयल एनफिल्डनं प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर हंटर 350 बाइक (Hunter 350) लॉन्च केली आहे. कंपनीनं ही बाईक रेट्रो आणि मेट्रो अशा दोन व्हेरिअंटमध्ये लॉन्च केली आहे. रॉयल एनफिल्डचे चाहते असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण हंटर-३५० बाइकची किंमतही तुलनेनं इतर बाइकपेक्षा स्वस्त आहे. Royal Enfield नं हंटर 350 चे रेट्रो व्हेरिएंट १,४९,९९० रुपये. तर मेट्रो व्हेरिएंटच्या Dapper सीरीजची किंमत १,६३,९०० रुपये असणार आहे. तसंच Rebel सिरीजच्या मेट्रो व्हेरियंट बाइकची किंमत १,६८,९०० रुपये एक्स-शोरुम असणार आहे. 

१.४९ लाख एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीसह, हंटर 350 ही Royal Enfield ची सर्वात स्वस्त बाईक बनली आहे. हंटर ३५० ही आधुनिक रेट्रो बाइक आहे. 

Hunter 350: रेट्रो व्हेरिअंट
हंटर 350 अर्बन क्रूझर बाईक म्हणून सादर करण्यात आली आहे. ग्राहकांना फोर्क गेटर्स आणि व्हिझरसह ब्लॅक-आउट इंजिन बे मिळतं. ब्लॉक पॅटर्न टायर वापरूनही याला स्क्रॅम्बलर लुक देऊ शकता. फॅक्टरी ब्लॅक आणि फॅक्टरी सिल्व्हर या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये ही बाईक देण्यात आली आहे. कंपनीनं याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत १.४९ लाख रुपयांसह लॉन्च केली आहे. 

Hunter 350: मेट्रो आणि मेट्रो रेबेल
मेट्रो रिबेलमध्ये ग्राहकांना रेबेल ब्लॅक, रिबेल ब्लू आणि रिबेल रेड रंगाचे पर्याय उपलब्ध असणार आहेत. त्याची एक्स-शोरूम किंमत १,६८,९०० रुपयांपासून सुरू होईल. दुसरीकडे, मेट्रो डॅपर सीरिजमध्ये डॅपर व्हाइट, डॅपर अॅश आणि डॅपर ग्रे असे पर्याय उपलब्ध आहेत. डॅपर सीरिजची सुरुवातीची किंमत १,६३,९०० रुपये, एक्स-शोरूम आहे. पण Rebel Red आणि Dapper Grey पर्याय फक्त Royal Enfield च्या MIY Personalize प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील.

फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
हंटर 350 बाइक कंपनीनं आधुनिक जे-सिरीज प्लॅटफॉर्मवर विकसित केली आहे. ग्राहकांना यामध्ये 349cc सिंगल सिलेंडर इंजिन मिळेल, ज्यामध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. रॉयल एनफिल्डनं अर्बन आणि सबरबन थीम्समध्ये ऍक्सेसरीजही रिलीज केल्या आहेत. रेट्रोला सिंगल चॅनल मिळतो, तर मेट्रोला ड्युअल चॅनल ABS, LED टेल लाईट आणि राउंड टर्न इंडिकेटर मिळतात. स्विच गियर आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.

Web Title: royal enfield hunter 350 launched with 1 49 lakh rupees starting price and retro metro rebel variants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.