रॉयल एनफिल्डने 650 सीसीच्या जुळ्या बुलेट केल्या लाँच...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 10:12 PM2018-11-14T22:12:04+5:302018-11-14T22:12:25+5:30
रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी जावा मोटारसायकल उद्या नवी बाईक लाँच करण्याच्या तयारीत असताना एनफिल्डने दोन जुळ्या मोटारसायकल लाँच करून आपणच भारतीय बाजाराचे राजे आहोत हे दाखवून दिले आहे.
रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी जावा मोटारसायकल उद्या नवी बाईक लाँच करण्याच्या तयारीत असताना एनफिल्डने दोन जुळ्या मोटारसायकल लाँच करून आपणच भारतीय बाजाराचे राजे आहोत हे दाखवून दिले आहे. रॉयल एनफिल्डने कॉन्टिनेंटल GT 650 आणि इंटरसेप्टर 650 या दोन धाकड मोटरसायकल लाँच केल्या आहेत.
जावा मोटारसायकल उद्या पुन्हा भारतात येत आहे. रॉयल एनफिल्डचा भारतीय बाजारावर मोठे नियंत्रण आहे. कॉन्टिनेंटल GT 650 ची किंमत एक्स शोरुम 2,65,000 तर इंटरसेप्टर 650 किंमत 2,50,000 रुपये ठेवण्यात आली आहे. या दोन्ही मोटारसायलींचे बुकिंग गेल्या महिन्यातच सुरु झाले होते. या मोटारसायकलना तीन वर्षांची वॉरंटी आणि रोड साईड असिस्टंसही मिळणार आहे.
या दोन बाईकचे बुकिंग 5 हजार रुपयांत करता येते. तसेच बुकिंगच्या 30 ते 45 दिवसांत बाईकची डिलिव्हरीही मिळणार आहे. 650 सीसीच्या या बाईकना नवीन प्लॅटफॉर्म देण्यात आला आहे. एअर कुल्ड, फ्युअल इंजेक्ट पॅरलल ट्वीन मोटर देण्यात आली आहे. 7250 आरपीएम आणि 47 बीएचपीची ताकद निर्माण करते. हे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिप-असिस्ट क्लच या सुविधा आहेत.
एबीएस प्रणाली असलेल्या या बाईकचा सर्वाधिक वेग 163 किमी आहे. पुढे टेलेस्कोपिक फोर्क्स सस्पेंशन पाठीमागे गॅस चार्ज ट्वीन सस्पेंशन देण्यात आले आहे.