Royal Enfield New Bike: Royal Enfield धमाका करणार; टेस्टिंगदरम्यान दिसली 'ही' नवी बाईक, जाणून घ्या फीचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 07:01 PM2023-05-10T19:01:08+5:302023-05-10T19:01:33+5:30
Royal Enfield New Bike: रॉयल एनफील्डच्या एका बहुप्रतीक्षित बाईकचे फोटो समोर आले आहेत.
Royal Enfield Himalayan 450: रॉयल एनफील्ड आपली बहुप्रतीक्षित हिमालयन 450 लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. अलीकडेच ही नवीन अॅडव्हेंचर मोटरसायकल टेस्टिंगदरम्यान दिसली होती. फोटोंवरून असे दिसते की, बाईक जवळजवळ प्रोडक्शन रेडी फेजमध्ये आहे. हिमालयन 450 आपल्या जुन्या हिमालयन 411 चे नवीन आणि अपटेडेट व्हर्जन आहे. पण, कंपनी आपल्या जुन्या हिमालयन 411 ला बंद करणार नाही. दोन्ही बाईक ग्राहकांसाठी उललब्ध असतील.
मिळालेल्या माहितीनुसार, हिमालयन 450 मध्ये ऑल-न्यू लिक्विड-कूल्ड 450cc इंजिन असेल. परंतू, याच्या पॉवर आउटपुटची माहिती समोर आलेली नाही. पण, अंदाजानुसार, याचे इंजिन सूमारे 40 बीएचपी जनरेट करेल. हिमालयन 450 मध्ये 6-स्पीड ट्रांसमिशन मिळू शकतो. हिमालयन 411 मध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स दिला आहे.
ही एक अॅडव्हेंचर बाईक असल्यामुळे तुम्हाला यात स्ट्रेट रायडिंग स्टांस मिळेल. ही दैनंदिन वापरासाठीदेखील उपयुक्त असेल. या नवीन हिमालयनच्या हँडलबार्स आणि फुट पेग्सला वर उचलले गेल्याचे दिसत आहे.
हिमालयन 450 मध्ये एलईडी हेडलँपसोबत अपसाइड-डाउन फ्रंट फोर्क्स आणि रिअर मोनो-शॉक सस्पेंशन मिळेल. फ्रंट आणि रिअरमध्ये डिस्क ब्रेक असतील. तसेच, ड्युअल-चॅनल ABS असतील. याच्या फ्रंटमध्ये 21 आणि रिअरमध्ये 18 इंच व्हील मिळतील.
Himalayan 450 मध्ये नवीन इंस्ट्रूमेंट क्लस्टर मिळेल. तसेच, यात इन-बिल्ट नॅव्हिगेशन सिस्टीम असेल. बाजारात Himalayan 450 चा सामना KTM 390 Adventure, Yezdi Adventure आणि BMW G 310 GS सारख्या बाईक्सशी असेल.