रॉयल एनफिल्डची नवीन बुलेट लवकरच लाँच होणार, हार्ले-ट्रायम्फला देणार टक्कर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 12:04 PM2023-07-14T12:04:11+5:302023-07-14T13:28:03+5:30

रिपोर्ट्सनुसार, या वर्षी सप्टेंबरमध्ये नवीन जनरेशन रॉयल एनफील्ड बुलेट 350 लाँच केली जाऊ शकते. 

royal enfield new bullet will be launched soon harley triumph | रॉयल एनफिल्डची नवीन बुलेट लवकरच लाँच होणार, हार्ले-ट्रायम्फला देणार टक्कर!

रॉयल एनफिल्डची नवीन बुलेट लवकरच लाँच होणार, हार्ले-ट्रायम्फला देणार टक्कर!

googlenewsNext

सध्या ऑटो मोबाईल क्षेत्रात वाहनांची मागणी वाढत असल्याचे दिसून यते आहे. यातच रॉयल एनफिल्डच्या बुलेटची स्वतःची एक वेगळी क्रेझ आहे. बुलेट ही खासकरून तरुणांची आवडती बाईक आहे. मार्केटमध्ये अनेक दुचाकी कंपन्या आपले मॉडेल्स आणत आहेत. या मॉडेल्सना टक्कर देण्यासाठी रॉयल एनफिल्ड आपल्या 350cc आणि 450cc रेंजमधील 3 नवीन बाईक्स आणण्यासाठी सज्ज आहे. मार्केटमध्ये स्वत:ला मजबूत ठेवण्यासाठी कंपनी पूर्ण तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार, या वर्षी सप्टेंबरमध्ये नवीन जनरेशन रॉयल एनफील्ड बुलेट 350 लाँच केली जाऊ शकते. 

बाईक उत्पादक कंपनी येत्या काही महिन्यांत न्यू जनरेशन हिमालयन (K1G) सादर करण्याच्या तयारीत आहे. मात्र कंपनीने याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. जे लोक 440cc मध्ये काही नवीन अपडेट्सची वाट पाहत होते, त्यांना कंपनी Scram (D4K) सोबत सरप्राइज देऊ शकते, ज्यावर सध्या काम सुरू आहे. कंपनी लवकरच ही बाईक मार्केटमध्ये आणण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, रॉयल एनफिल्ड एल-प्लॅटफॉर्म आणि आर-प्लॅटफॉर्मवर आधारित आपल्या इलेक्ट्रिक 750CC बाईकवर देखील काम करत आहे. तसेच,  कंपनी 2025 पर्यंत ही बाईक तयार करू शकते, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Harley-Davidson X440
मार्केटमध्ये नुकत्याच Harley-Davidson X440 आणि Triumph Speed ​​400 च्या लाँचिंगमुळे मिडलवेट बाईक सेगमेंटमधील स्पर्धा वाढली आहे. या बाईक्स निर्मात्यांकडून परवडणाऱ्या ऑफर्स दिल्या आहेत.  Harley-Davidson X440 ही हिरो आणि हार्ले यांच्या भागीदारीतून लाँच करण्यात आली आहे. तर Triumph Speed ​​400 हे बजाज ऑटो आणि ट्रायम्फ यांनी भागीदारीत पहिले उत्पादन लाँच केले आहे. दरम्यान, बुलेट 350, क्लासिक 340, हंटर 350, मेटिओर 350 आणि हिमालयन 400 सारख्या लोकप्रिय मॉडेल्सची विक्री करणार्‍या रॉयल एनफिल्डला दोन्ही उत्पादक टक्कर देऊ इच्छित आहेत.
 

Web Title: royal enfield new bullet will be launched soon harley triumph

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.