Royal Enfield मोठ्या धमाक्यासाठी तयार, लवकरच येतेय कमी किमतीतली अ‍ॅडव्हेंचर बाईक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 05:53 PM2022-03-05T17:53:54+5:302022-03-05T17:54:22+5:30

Royal enfield

Royal Enfield ready for the big bang, the soon to be launch new scram 411 adventure bike | Royal Enfield मोठ्या धमाक्यासाठी तयार, लवकरच येतेय कमी किमतीतली अ‍ॅडव्हेंचर बाईक

Royal Enfield मोठ्या धमाक्यासाठी तयार, लवकरच येतेय कमी किमतीतली अ‍ॅडव्हेंचर बाईक

googlenewsNext

नवी दिल्ली - Royal Enfield ने 2022 मध्ये लॉन्चची तयारी पूर्ण केली आहे आणि कंपनीने या वर्षी सर्वात पहिले Scram 411 लाँच करण्याची घोषणाही केली आहे. रॉयल एनफील्ड 7 मार्चला भारतात एक नवीन अ‍ॅडव्हेंचर दुचाकी लाँच करणार आहे, जी आर्थिकदृष्ट्या परवडणारी आणि हिमालयनचे एक कमी शक्तीशाली व्हेरिअंट आहे. भारतीय ग्राहक या दुचाकीची दीर्घकाळापासून वाट बघत आहेत. ही ऑफ-रोडिंग बरोबरच रस्त्यांवरही चालवली जाऊ शकेल, अशा प्रकारे डिझाइन करण्यात आली आहे. म्हणजेच रॉयल एनफील्डने स्क्रॅम 411 ही केवळ ऑफ-रोडिंगच नाही, तर शहरी रस्त्यांवरही चलविली जाऊ शकेल अशा पद्धतीने तयार केली आहे.

लाल आणि काळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये -
ही नवी अ‍ॅडव्हेंचर दुचाकी लाल आणि काळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये दिसून आली आहे. या पूर्वीही scrum 411 अनेक वेळा दिसून आली असली तरी, ती ड्युअल टोनमध्ये दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. या बाईकला पुढच्या बाजूला 19-इंचाचे चाक तर मागील बाजूस 17-इंचाचे चाक देण्यात आले आहे. या बाईकची किंमत बहुतेक ग्राहकांना परवडेल अशा पद्धतीने असेल. हिची अंदाजे किंमत सुमारे 1.90 लाख रुपयांच्या जवळपास असेल.

हिमालयनच्या तुलनेत स्वस्त -
रॉयल एनफील्ड हिमालयनच्या तुलनेत नवी स्क्रॅम 411 स्वस्त असेल. स्क्रॅम 411 ला छोटी चाके, सिंगल पीस सीट, छोटे सस्पेंशन ट्रॅव्हल आणि मागच्या बाजूला ग्रॅब रेल दिली आहे. या नव्या दुचाकीला LS410, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक, SOHC इंजिन असण्याचा अंदाज आहे. जे 411 CC चे असेल आणि 24.3 bhp एवढी शक्ती तयार करेल.


 

Web Title: Royal Enfield ready for the big bang, the soon to be launch new scram 411 adventure bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.