Royal Enfield Sherpa 650: विसरून जाल Bullet, आता Royal Enfield आणतेय अशी ढासू बाईक; पाहताच प्रेमात पडाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 08:26 PM2023-01-06T20:26:27+5:302023-01-06T20:26:59+5:30

माध्यमांतील वृत्तांनुसार, या नव्या रॉयल एनफील्ड 650cc स्क्रॅम्बलरच्या प्रोडक्शन-रेडी व्हर्जनचे नाव 'Royal Enfield Sherpa 650' असू शकते. ही आरई बुलेटपेक्षाही वरच्या सेगमेंटमधील बाईक असेल.

royal enfield sherpa 650 now Royal Enfield is bringing a new bike You will fall in love as soon as you see it know about features | Royal Enfield Sherpa 650: विसरून जाल Bullet, आता Royal Enfield आणतेय अशी ढासू बाईक; पाहताच प्रेमात पडाल!

Royal Enfield Sherpa 650: विसरून जाल Bullet, आता Royal Enfield आणतेय अशी ढासू बाईक; पाहताच प्रेमात पडाल!

googlenewsNext


रॉयल एनफील्डने काही 350cc आणि 650cc मोटारसायकल लाँच करण्यासंदर्भात पुष्टी केली आहे, यांपैकी काहींचीतर टेस्टिंगदेखील सुरू आहे. हे मॉडेल्स देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठांमध्येही उपलब्ध असतील. आगामी नव्या रॉयल एनफील्ड बाईक्सपैकीच एक म्हणजे, 650cc स्क्रॅम्बलर. ही  2022 च्या अखेरीस टेस्टिंग दरम्यान दिसून आली होती. माध्यमांतील वृत्तांनुसार, या नव्या रॉयल एनफील्ड 650cc स्क्रॅम्बलरच्या प्रोडक्शन-रेडी व्हर्जनचे नाव 'Royal Enfield Sherpa 650' असू शकते. ही आरई बुलेटपेक्षाही वरच्या सेगमेंटमधील बाईक असेल.

Royal Enfield Sherpa 650 चे इंजिन आणि पॉवर -
या बाईला 648cc, पॅरेलल-ट्विन इंजिन दिले जाऊ शकते. जे 47bhp पॉवर आणि 52Nm टार्क जनरेट करू शकते. कंपनी क्रूझर मोटारसायकलच्या आवश्यकतेनुसार, इंजिन ट्यून करू शकसते. ही बाईक स्लिपर क्लच आणि 6-स्पीड गिअरबॉक्ससह येईल. हिच्या स्पॉटेड प्रोटोटाईपच्या फ्रंटला अपसाईड-डाऊन फोर्क सस्पेंशन आणि रिअरमध्ये डुअल शॉक एब्जॉर्बर होते. तसेच हिच्या फ्रंट आणि रिअरला डिस्क ब्रेकदेखील दिसून आले होते. या बाईकमध्ये स्टँडर्ड फिटमेन्ट म्हणून डुअल-चॅनल ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम) देखील मिळेल. 

Royal Enfield Sherpa 650 मध्ये असतील असे फीचर्स -
नव्या आरई 650 सीसी बाईकच्या पुढील साईडला एक छोटी फ्लायस्क्रीन असेल, जी विंड प्रोटेक्शनच्या रूपात काम करेल. खरे तर ही अॅक्सेसरी पॅकचा भाग असू शकते. आगामी रॉयल एनफील्ड शेरपा 650 ही 2-इनटू-1 एक्झॉस्ट सिस्टिमसोबत येणारी ब्रँडची पहिलीच बाईक असेल. यात रेट्रो-स्टाईल सर्क्युलर हेडलॅम्प, टियरड्रॉप-शेप्ड फ्यूल टँक आणि फ्लॅट सीट असू शकते. या बाईकला सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल आणि ट्रिपर नेव्हिगेशन सिस्टिमही देली जाऊ शकते.

Web Title: royal enfield sherpa 650 now Royal Enfield is bringing a new bike You will fall in love as soon as you see it know about features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.