Royal Enfield Super Meteor 650 : फक्त 2 हजारांत 'ही' क्रूझर बाईक बुक करू शकता; जाणून घ्या इंजिन, ब्रेकिंग सिस्टमची संपूर्ण माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 12:54 PM2022-11-21T12:54:18+5:302022-11-21T12:54:48+5:30
Royal Enfield Super Meteor 650 ही एक प्रिमियम क्रूझर बाईक आहे. या बाईकची अपेक्षित किंमत, इंजिन, ब्रेकिंग सिस्टीम आणि स्पेसिफिकेशन्स याबद्दल जाणून घ्या....
रॉयल एनफिल्डने (Royal Enfield) प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आपली नवीन क्रूझर बाईक Royal Enfield Super Meteor 650 आणली आहे . या बाईकचे जागतिक पदार्पण कंपनीने EICMA 2022 ऑटो शोमध्ये केले आहे. Royal Enfield Super Meteor 650 ही एक प्रिमियम क्रूझर बाईक आहे. या बाईकची अपेक्षित किंमत, इंजिन, ब्रेकिंग सिस्टीम आणि स्पेसिफिकेशन्स याबद्दल जाणून घ्या....
रॉयल एनफिल्डने Super Meteor 650 दोन व्हेरिएंटसह बाजारात लाँच केली आहे. पहिला व्हेरिएंट म्हणजे Super Meteor 650 आणि दुसरा व्हेरिएंट म्हणजे Super Meteor 650 Tourer आहे. रॉयल एनफिल्डने अद्याप या बाईकच्या किंमतीबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण रिपोर्ट्सनुसार, कंपनी ही बाईक 3.90 लाख ते 4.30 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह येऊ शकते.
Royal Enfield Meteor खरेदी करण्यासाठी कंपनीने आपली बुकिंग विंडो उघडली आहे. ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आणि त्यांच्या जवळच्या डीलरशिपला भेट देऊन ते बुक करू शकतात. या बाईकच्या बुकिंगसाठी कंपनीने 2,000 रुपये टोकन रक्कम निश्चित केली आहे. Royal Enfield Super Meteor 650 मध्ये 648 cc इंजिन आहे. हे इंजिन 47 PS कमाल पॉवर आणि 52 Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन स्लिपर क्लच असिस्टसह 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
Royal Enfield Super Meteor 650 Braking and Suspension System
बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर, यात समोर 320 mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 300 mm डिस्क ब्रेक आहे, ज्यामध्ये ड्युअल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम जोडण्यात आली आहे. सस्पेन्शन सिस्टीम बद्दल बोलायचे झाले तर समोर 43 mm अप साइड डाउन फोर्क सस्पेन्शन बसविण्यात आले आहे आणि मागील बाजूस ट्विन गॅस चार्ज शॉक ऍब्जॉर्बर सस्पेन्शन सिस्टीम बसविण्यात आली आहे.
Royal Enfield Super Meteor 650 Color
कंपनीने या बाईकचे दोन्ही व्हेरिएंट वेगवेगळ्या कलर ऑप्शनसह बाजारात आणली आहे. Super Meteor 650 खरेदी करण्यासाठी पाच कलर ऑप्शन उपलब्ध आहेत, जे Astral Black, Astral Blue, Astral Green, Interstellar Grey आणि Interstellar Green आहेत. याचबरोबर, Super Meteor 650 Tourer खरेदी करण्यासाठी कंपनीने दोन कलरचा ऑप्शन दिला आहे. यामध्ये पहिला कलर Celestial Red आणि दुसरा कलर Celestial Blue आहे.