Royal Enfield भारतात लाँच करणार 6 नवीन बाइक्स! जाणून घ्या काय फीचर्स असू शकतात? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 03:48 PM2022-04-30T15:48:10+5:302022-04-30T16:37:44+5:30

Royal Enfield : कंपनी 350cc आणि 650cc सेगमेंटमध्ये अनेक मोटारसायकल्स लॉन्च करणार आहे. याशिवाय रॉयल एनफिल्ड नवीन हिमालयन अॅडव्हेंचर मोटारसायकल देखील आणणार आहे.

royal enfield to launch 6 new bikes in india know what are the special features | Royal Enfield भारतात लाँच करणार 6 नवीन बाइक्स! जाणून घ्या काय फीचर्स असू शकतात? 

Royal Enfield भारतात लाँच करणार 6 नवीन बाइक्स! जाणून घ्या काय फीचर्स असू शकतात? 

googlenewsNext

नवी दिल्ली : Scram 411 लाँच केल्यानंतर रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) आता 2023 च्या अखेरीस भारतीय बाजारात 6 नवीन मोटरसायकल लॉन्च करण्याची योजना आखत आहे. कंपनी 350cc आणि 650cc सेगमेंटमध्ये अनेक मोटारसायकल्स लॉन्च करणार आहे. याशिवाय रॉयल एनफिल्ड नवीन हिमालयन अॅडव्हेंचर मोटारसायकल देखील आणणार आहे. दरम्यान, रॉयल एनफिल्डच्या आगामी मोटारसायकल्स कोणत्या आहेत? याविषयी जाणून घेऊया...

रॉयल एनफिल्ड SHOTGUN 650
रॉयल एनफिल्डने 2021 EICMA मध्ये SG650 कॉन्सेप्टला शोकेस केले होते. मोटारसायकलला राउंड हेडलॅम्प आणि रियर-व्ह्यू मिररसोबत टीयरड्रॉप शेप्ड फ्यूल टँक आणि वाइड  रिअर मडगार्डसारखी क्लासिक डिझाईन एलिमेंटचा समावेश आहे. शॉटगन 650 ला 648cc पॅरलल-ट्विन, एअर-कूल्ड इंजिन मिळण्याची शक्यता आहे, जे 47bhp आणि 52N टॉर्क जनरेट करते.

रॉयल एनफिल्ड SUPER METEOR 650
रॉयल एनफिल्ड क्रूझर मोटरसायकलची देखील चाचणी करत आहे, जी Super Meteor असेल. मोटरसायकलमध्ये इंटरसेप्टर 650 असणारा पॉवरट्रेन असू शकतो.  Super Meteor मध्ये अपसाइड डाऊन फ्रंट फोर्क्स आणि रिअरमध्ये ट्विन शॉक एब्जॉर्बर असण्याची शक्यता आहे. तसेच, यात ड्युअल-चॅनल एबीएससह डिस्क ब्रेक दिला जाऊ शकतो. 

रॉयल एनफिल्ड HUNTER 350
रॉयल एनफिल्ड कंपनी 2022 च्या मध्यापर्यंत रॉयल एनफिल्ड हंटर 350 लाँच करू शकते. मोटारसायकल भारतात प्रोडक्शन बॉडी पार्ट्ससह दिसली आहे. नवीन रॉयल एनफील्ड हंटर 350 मध्ये सिंगल-पीस सीट, आरामदायी एर्गोनॉमिक्स, रेट्रो-शैलीतील वर्तुळाकार हेडलॅम्प, डिस्क ब्रेक्स मिळतील. मोटारसायकलला नवीन 349cc, एअर-कूल्ड इंजिन मिळेल.

नेक्स्ट जनरेशन BULLET 350
फक्त हंटरच नाही तर रॉयल एनफिल्डने नेक्स्ट जनरेशन बुलेट 350 ची चाचणी देखील भारतात सुरु केली आहे. नवीन मॉडेल नवीन J-सिरीज प्लॅटफॉर्मवर आधारित असू शकते. या मोटरसायकलला 349 cc, एअर/ऑइल कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन मिळेल, जे क्लासिक 350 सारखे असेल. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्ससह येऊ शकते.

रॉयल एनफिल्ड CLASSIC 650
रॉयल एनफिल्ड 2023 मध्ये देशात एक नवीन 650cc क्लासिक मोटरसायकल लाँच करू शकते. भारतीय रस्त्यांवर अनेक वेळा मोटरसायकल चाचणी करताना दिसली आहे. नवीन क्लासिक 650 मध्ये गोलाकार हेडलॅम्प आणि टीयरड्रॉप आकाराची इंधन टाकी यांसारखे रेट्रो डिझाइन एलिमेंट असणार आहेत. क्लासिक 650 मध्ये 649cc, ट्विन सिलेंडर इंजिन असण्याची शक्यता आहे, जे 47bhp आणि 52Nm टॉर्क निर्माण करते.

रॉयल एनफिल्ड HIMALAYAN 450
रॉयल एनफिल्ड नवीन पिढीच्या हिमालयन अॅडव्हेंचर मोटारसायकलवर काम करत आहे, जी अलीकडेच भारतात चाचणी करताना दिसून आली. नवीन मोटरसायकल नवीन 450cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिनसह येईल, जे सुमारे 40bhp आणि 45Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. हे 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले जाईल. 2023 मध्ये हिमालयन अॅडव्हेंचर लॉन्च होईल अशी अपेक्षा आहे.

Web Title: royal enfield to launch 6 new bikes in india know what are the special features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.