आता हंगामा करण्यासाठी येतेय Royal Enfield ची इलेक्ट्रिक बाईक, अशी असेल खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 04:41 PM2022-05-20T16:41:02+5:302022-05-20T16:41:55+5:30

Royal Enfield Electric Motorcycle: TVS, Hero, Ather आणि BMW सारखे मोठे वाहन निर्माते येणाऱ्या काही महिन्यांत आपल्य इलेक्ट्रिक टू-व्हिलर्स भारतात लॉन्च करणार आहेत. तर आता या शर्यतीत कडवी टक्कर देण्यासाठी रॉयल एनफील्डनेही कंबर कसली आहे.

Royal Enfield's electric bike royal enfield to launch electric motorcycle by next year confirms ceo siddharth lal | आता हंगामा करण्यासाठी येतेय Royal Enfield ची इलेक्ट्रिक बाईक, अशी असेल खासियत

आता हंगामा करण्यासाठी येतेय Royal Enfield ची इलेक्ट्रिक बाईक, अशी असेल खासियत

googlenewsNext

आयशरच्या मालिकी हक्काची कंपनी इलेक्ट्रिक मोटारसायकल सेगमेंटमध्ये एन्ट्री करण्याचा प्लॅन तयार करत आहे, असे रॉयल एनफील्डचे सीईओ विनोद दसारी यांनी ऑगस्त 2020 मध्ये म्हटले होते. या घोषणेनंतर, भारतीय मोटारसायकल निर्मात्या कंपनीने, आपल्या 2020-21 च्या वार्षिक अहवालात, कंपनी बाईक्सच्या इलेक्ट्रिक रेंजवर काम करत असल्याचे सागितले होते. 

TVS, Hero, Ather आणि BMW सारखे मोठे वाहन निर्माते येणाऱ्या काही महिन्यांत आपल्य इलेक्ट्रिक टू-व्हिलर्स भारतात लॉन्च करणार आहेत. तर आता या शर्यतीत कडवी टक्कर देण्यासाठी रॉयल एनफील्डनेही कंबर कसली आहे.

रॉयल एनफील्ड ईव्हीचे प्रोटोटाईप तयार -
भारत आणि परदेशी बाजारपेठांमध्ये रॉयल एनफील्डच्या इलेक्ट्रिक बाइक्स पोहोचवण्यासाठी प्रोडक्शन लाईन तयार करण्यात आली असल्याचे रॉयल एनफील्डचे मॅनेजिंग डायरेक्टर सिद्धार्थ लाल यांनी म्हटले आहे. पर्यावरण, लोकांच्या भवष्याची चिंता, याबरोबरच सरकारच्या व्हिजनवर काम करताना चेंन्नईची ही कंपनी लवकरात लवकर बाइक्सच्या इलेक्ट्रिफिकेशनचे काम करेल. याशिवाय, रॉयल एनफील्डने इलेक्ट्रिक बाईक्सचे प्रोटोटाईपही तयार करून ठेवले आहेत. याचे उत्पादन लवकरात लवकर सुरू होईल, असे विनोद यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. कंपनी या नव्या इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रिक मोटारसायकल तयार करेल. तसेच हिच्यासोबत लेटेस्ट फिचर्सदेखील देण्यात येतील.

केव्हापर्यंत लॉन्च होणार बाईक - 
रॉयल एनफील्डने 2023 मध्ये अनेक इलेक्ट्रिक मोटारसायकल्स तयार करण्याचा प्लॅन बनवला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, या बाईकसोबत 8 ते 10 किलोवॅट-आवर बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. हिला दमदार इलेक्ट्रिक मोटार असेल. मार्केटमधील ट्रेंड पाहता या बाईकची मोटार 40 बीएचपी एवढ्या शक्तीची आणि 100 एनएम पीक टॉर्क क्षमतेची असू शकते, असा अंदाज आहे.
 

Web Title: Royal Enfield's electric bike royal enfield to launch electric motorcycle by next year confirms ceo siddharth lal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.