रॉयल एनफील्डची नवी 650cc बाईक धुमाकूळ घालायला तयार; समोर आले डिटेल्स! जाणून घ्या केव्हा होणार लॉन्च
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 05:07 PM2022-12-11T17:07:07+5:302022-12-11T17:07:58+5:30
ही बाईक नुकतीच टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली. यापूर्वीही ही बाईक अनेक वेळा स्पॉट झाली आहे.
दुचाकी निर्माता कंपनी रॉयल एनफील्ड आपल्या इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 सरख्या प्लॅटफॉर्मवर बेस्ड अनेक नवीन 650cc बाईक्सवर काम करत आहे. यातील, 650cc स्क्रॅम्बलर ही सर्वाधिक विशेष आहे. ही बाईक नुकतीच टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली. यापूर्वीही ही बाईक अनेक वेळा स्पॉट झाली आहे. मात्र, हिच्या नव्या स्पाय शॉट्समधून काही डिटेल्स समोर आले आहेत.
सुपर मेटोर-650 सारखे हेडलॅम्प -
650cc स्क्रॅम्बलरला एक गोल एलईडी हेडलॅम्प दिसून येतो. जो नुकताच अनावरण करण्यात आलेल्या Super Meteor-650 मॉडेलसारखा दिसतो. खरे तर ही पहिलीच रॉय एन्फिल्ड आहे, ही फुल-एलईडी हेडलॅम्पसह येत आहे. या बाईकमध्ये इंटरसेप्टरसारखा ब्रेस्ड हँडलबार दिसून येतो.
इतर ऑब्झर्वेशनसंदर्भात बोलायचे झाल्यास, या बाईकला अपसाईड-डाऊन फोर्क्स अप फ्रंट देण्यात आला आहे. दूरच्या प्रवासाच्या दृष्टीने हिचे सस्पेन्शन डिझाईन करण्यात आले आहे. डुअल परपज टायर्ससह या बाईकला वायर-स्पोक व्हिल्स, सिंगल-पीस स्टेप्ड सीट आणि सिंगल स्टबी एग्जॉस्ट कॅनिस्टर देण्यात आले आहे. हिच्या इंजीनसंदर्भात बोलायचे झाल्यास, हिला 648cc चे पॅरलल-ट्विन, एअर/ऑईल-कूल्ड मोटर असण्याची शक्यता आहे. जी रॉयल एनफील्डच्या सध्याच्या 650cc मॉडेलवर बेस्ड आहे. खरे तर, हिचे ट्युनिंग आणि एक्झॉस्ट साउंड थोडा वेगळा असू शकतो.
केव्हा होणार लॉन्च? -
रॉयल एनफील्डच्या 650cc स्क्रॅम्बलरच्या लॉन्चसंदर्भात अद्याप स्पष्टपणे माहिती मिळालेली नाही. मात्र आशा आहे, की ही पुढील वर्षाच्या अखेरर्यंत अथवा 2024 च्या सुरुवातीला लॉन्च होऊ शकते.