अरे बाप रे बाप! २५ कोटींच्या कारला ५२ कोटी रूपयांची नंबरप्लेट, व्हिडीओ बघून चक्रावून जाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 02:58 PM2021-05-15T14:58:27+5:302021-05-15T14:59:24+5:30
प्रत्येकाला पसंतीचा मोबाईल नबंर आणि गाडीला फॅन्सी नंबर असलेला आवडतो. ( Rs. 52 Crore numberplate on Rs. 25 Crore Bugatti Chiron)
प्रत्येकाला पसंतीचा मोबाईल नबंर आणि गाडीला फॅन्सी नंबर असलेला आवडतो. सध्या तर तशी क्रेझच निर्माण झाली आहे आणि ही क्रेझ आपला खिसा कसा कापतेय हे अनेकांना कळतही नाही किंवा कळत असलं तरी त्याची ते पर्वा करत नाही. असेच काहीसे सध्या घडलेलं पाहायला मिळत आहे. आपल्या आवडत्या नंबरप्लेटसाठी एका पठ्ठ्यानं तब्बल 52 कोटी रुपये खर्च केले. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण हे खरं आहे.. खरा धक्का तर पुढे आहे. एका ग्राहकानं Bugatti Chiron साठी 52 कोटींची नंबरप्लेट खरेदी केली. ( Rs. 52 Crore numberplate on Rs. 25 Crore Bugatti Chiron)
Bugatti Chiron ची किंमत सांगायची तर सर्वात महागड्या कारमध्ये ती मोडले. या सुपर गाडीची किंमत 25 कोटी आहे आणि कस्टमायजेशनच्या हिशोबानं ही किंमत आणखी वाढते. पण, नंबरप्लेटसाठी गाडीच्या मुळ किंमतीपेक्षा दुप्पट रक्कम खर्च केली गेली. YouTube पर Mo Vlogs नावाच्या एका चॅनेलवर या गाडीबाबत व त्याच्या नंबरप्लेटबाबात माहिती देण्यात आली आहे. व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार कारच्या रजिस्ट्रेशन नंबरची किंमत 70 लाख डॉलर म्हणजे जवळपास 52 कोटी इतकी आहे.
Bugatti Chiron च्या किंमतीपेक्षा रजिस्ट्रेशन नंबरची किंमत दुप्पट आहे आणि तो नंबर फक्त '9' असा आहे. आता तुम्ही विचार कराल '9' क्रमांकासाठी एवढी रक्कम का?. Mo vlog च्या व्हिडीओत सांगितल्यानुसार रजिस्ट्रेशन प्लेटची किंमत ही त्याच्या नंबरच्या साइजवर अवलंबून आहे. त्यामुळे Bugatti Chiron वर लावलेल्या सिंगल डिजीट क्रमांकाची किंमत अधिक आहे. जर तुम्ही अधिक क्रमांकाची नंबरप्लेट घेतली, तर त्याची किंमत कमी होत जाते. काही लोकं नंबरप्लेट्समध्ये गुंतवणूक करतात आणि मोठ्या किंमतीत ती विकतात. त्याचा लिलाव केला जातो.
पाहा व्हिडिओ..
Bugatti Chiron बाबत काही खास गोष्टी
Bugatti Chiron ही कार Chiron Sport मॉडेल आहे. 2018मध्ये जीनेव्हा इंटरनॅशनल मोटर शोमध्ये तिचं सादरीकरण झालं होतं. Chiron Sport कार ही Chiron चा स्पोर्ट्स वर्जन आहे. ही गाडी स्टँडर्ड Chironपेक्षा 18 किलो वजनानं हलकी आहे.