₹७३४८१ च्या 'या' बाईकवर लोकांच्या उड्या, ३० दिवसांत २.६५ लाख ग्राहकांची खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 05:00 PM2023-05-24T17:00:45+5:302023-05-24T17:01:01+5:30
पाहा कोणत्या आहेत टॉप १० सेलिंग टू व्हिलर्स.
Hero Splendor Becomes Best Selling Bike In April : हीरो मोटोकॉर्पच्या (Hero MotoCorp) दुचाकींनी भारतीय बाजारपेठेत धमाकाच केलाय. आम्ही तुम्हाला हीरो स्प्लेंडरबद्दल सांगत आहोत. या बाईकची सुरुवातीची किंमत 74,000 रुपयांपेक्षा कमी आहे. बऱ्याच काळापासून हीरो स्प्लेंडर ही अनेकांच्या पसंतीची बाईक ठरतेय. एप्रिल 2023 मध्येही तिने अव्वल स्थान कायम ठेवलंय. होडा ॲक्टिव्हा तसंच बजाज पल्सर आणि टीवीएस आपाचे सारख्या स्कूटर आणि बाइक्सना मागे टाकत स्प्लेंडरनं अव्वल स्थान कायम ठेवलंय. आपण भारतीय बाजारपेठेतील टॉप 10 दुचाकींबद्दल जाणू घेऊ.
एप्रिल महिन्यात ग्राहकांनी हीरो स्प्लेंडरलाच पसंती दिल्याचं दिसून आलं. एप्रिल 2023 मध्ये 13.3 टक्क्यांच्या वार्षिक वाढीसह 2,65,225 ग्राहकांनी ही बाईक खरेदी केली. तर होंडा ॲक्टिव्हाच्या विक्रीतही वार्षिक 50.6 टक्क्यांनी वाढ झाली. या स्कूटरच्या 2,46,016 युनिट्सची विक्री झाली. तर बजाज पल्सरच्या 1,15,371 युनिट विक्री झाली असून त्यानं तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. त्यापाठोपाठ होंडा सीबी शाइन आणि हिरो एचएफ डिलक्स यांच्या अनुक्रमे 89,261 आणि 78,700 युनिट्सच्या विक्रीसह चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.
स्कूटर्सची उत्तम विक्री
एप्रिल 2023 च्या टॉप 10 सर्वाधिक विक्री होणाऱ्या दुचाकींच्या यादीत, टीवीएस ज्युपिटर सहाव्या स्थानावर होती. या कालावधीत या स्कूटरच्या 59,583 युनिट्सची विक्री झाली. त्यानंतर सुझुकी ऍक्सेस, बजाज प्लॅटिना, टीवीएस आपाचे आणि टीवीएस एक्सएल 100 या बाईकची सर्वाधिक विक्री झाली आहे.