बाईक चालवताना कुत्रे मागे लागतात..? 'हा' उपाय करा; ढुंकूनही बघणार नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 01:55 PM2022-01-31T13:55:05+5:302022-01-31T14:05:40+5:30
दुचाकीवरून जात असताना कुत्रे मागे लागल्यावर अनेकांची भितीनं गाळण उडते
बाईक चालवताना कुत्रे मागे लागतात..? करा 'हा' उपाय; त्रासातून होईल सुटका
तुम्ही कितीही धाडसी असाल, पण बाईक, स्कूटरवरून जात असताना कुत्रे मागे लागल्यावर भीती वाटतेच. दुचाकीवरून जात असताना अनेकदा कुत्रे मागे लागतात. विशेषत: रात्री कुत्रे मागे लावल्यावर अनेकांची भीतीनं पार गाळण उडते. रात्री बाईक येताना दिसली की कुत्रे जवळ येतात आणि वेगानं पळण्यास सुरुवात करतात. अशा वेळी अनेक जण ऍक्सिलेटर देऊन तिथून शक्य तितक्या लवकर निघून जाण्याचा प्रयत्न करतात. याच प्रयत्नात बऱ्याचदा अपघात होतात.
बाईकवरून जात असताना कुत्रे मागे लागल्यावर घाबरू नका. त्यांच्यापासून सुटका करण्याचा उपाय अतिशय सोपा आहे. घाबरून जाऊन बाईक वेगात पळवू नका. त्यामुळे दुर्घटना घडण्याचा धोका असतो. त्याऐवजी बाईकचा वेग कमी करा. असं केल्यानंतर बहुतांश कुत्रे पळणं आणि भुंकणं बंद करतात.
बाईकचा वेग कमी केल्यावरही कुत्र्यांनी पाठलाग सुरू ठेवताच बाईक थांबवा. त्यानंतर कुत्रे अवघ्या काही सेकंदांनतर शांत होऊन त्यांच्या मार्गानं निघून जातील. कुत्रे शांत झाल्यावर दुचाकीचा वेळ हळू हळू वाढवा आणि तिथून निघून जा. कुत्रे भुंकत मागे लागले असताना दुचाकीचा वेग कमी करणं किंवा दुचाकी थांबवणं हेच उत्तम उपाय आहेत.