'ही' आहे देशातील सर्वात सुरक्षित कार...फोर्डलाही टाकले मागे...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 09:29 AM2018-12-09T09:29:31+5:302018-12-09T09:30:05+5:30
एकेकाळी क्वालिटीच्या नावाने बदनाम झालेली टाटा मोटर्स आज जगभरात नावाजली जात आहे.
मुंबई : एकेकाळी क्वालिटीच्या नावाने बदनाम झालेली टाटा मोटर्स आज जगभरात नावाजली जात आहे. टाटाची नेक्सॉन या कारला ग्लोबल एनकॅप टेस्टमध्ये पाच पैकी पाच स्टार मिळाल्याने या कारची चर्चा होत आहे. याचबरोबर नेक्सॉन ही भारतातील सर्वाधिक सुरक्षित कार बनली आहे. या कारने गेल्या महिन्यात फोर्डच्या इकोस्पोर्टलाही विक्रीमध्ये मागे टाकले आहे.
ग्लोबल NCAP मध्ये भारतीय कारची क्रॅश सेफ्टी टेस्ट 2014 पासून करण्यात येते. यामुळे भारतातील किती देते हे पाहणाऱ्या ग्राहकांना त्यांची कार किती सुरक्षित आहे हे समजू लागले. ग्राहकांची मानसिकता बदलत असून सुरक्षा पुरविणाऱ्या कारकडे ग्राहक वळू लागल्याचे चित्र आहे.
टाटाच्या नेक्सॉनला गेल्यावर्षी ग्लोबल NCAP मध्ये चार स्टार मिळाले होते. मात्र, यामध्ये कंपनीने सुधारणा करून नव्याने सुरक्षेच्या उपाययोजना केल्याने यंदाच्या क्रॅशटेस्टमध्ये या कारला 5 स्टार मिळाले आहेत. तर लहान मुलांच्या सुरक्षेमध्ये या कारने तीन स्टार मिळविले आहेत. कंपनीने काही अतिरिक्त सुरक्षा फिचर्स देताना ड्रायव्हर आणि पॅसेंजरसाठी सीटबेल्ट रिमाइंडर आणि UN95 नियमावली लागू करण्यासाठी नेक्सॉनच्या बांधणीवर काम केले आहे.
ग्लोबल NCAP चे सचिव डेविड वार्ड यांनी सांगितले की, नेक्सॉनने मिळविलेले रेटिंग हे भारतीय कारसाठी मैलाचा दगड आहे. भारतातील कार एवढे स्टार कधीच घेत नाही. भारतीय बनावटीच्या या कारने चांगली सुरक्षा आणि बांधणी दिली आहे. तसेच जगालाही दाखवून दिले आहे, की 5 स्टार मिळविण्यासाठी तुम्ही मेक इन इंडिया कार बनवायला हरकत नाही. NCAP भारताकडून पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठीच्या प्रणालीची वाट पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले.