भारतातील कारची भारतातच होणार सेफ्टी रेटिंग टेस्ट! Bharat NCAP चे गडकरी आज उद्घाटन करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 12:21 PM2023-08-22T12:21:00+5:302023-08-22T12:56:27+5:30
आता भारतीय कंपन्यांच्या कार किती सुरक्षित हे पडताळण्यासाठी भारतातच क्रॅश टेस्टिंग सुरु केली जाणार आहे.
देशातील कार किती सुरक्षित आहेत, कोणत्या कंपन्यांच्या कार सुरक्षित आहेत कोणत्या नाहीत हे आजवर ग्लोबल एनकॅपकडून ठरविले जात होते. टाटाच्या कारने पहिल्यांदा देशातील पहिली फाईव्ह स्टार सुरक्षा रेटिंग असलेली कारचा खिताब मिळविला होता. आता देशात जवळपास १० च्यावर कार या फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगच्या आहेत.
आता भारतीय कंपन्यांच्या कार किती सुरक्षित हे पडताळण्यासाठी भारतातच क्रॅश टेस्टिंग सुरु केली जाणार आहे. भारतीय एनकॅपचे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्घाटन करणार आहेत. देशात सध्या टाटा, महिंद्रा, स्कोडा, फोक्सवॅगन या कंपन्यांच्या कारना फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगच्या आहेत.
भारत एनकॅपमध्ये काय खास गोष्टी असतील चला पाहुयात...
भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (एनसीएपी) Bharat New Car Assessment Program (Bharat NCAP) मध्ये वाहन उत्पादक या कार्यक्रमांतर्गत ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड (AIS) 197 नुसार स्वेच्छेने त्यांच्या वाहनांची चाचणी घेऊ शकतात. वाहनांना त्यांच्या चाचणी आणि कार्यक्षमतेच्या आधारे प्रौढ प्रवासी (AOP) आणि लहान मुलांसाठी (COP) स्टार रेटिंग दिले जाणार आहे.
भारतातील मोटार वाहनांची सुरक्षितता 3.5 टनांपर्यंत वाढवून रस्ता सुरक्षा सुधारण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. यामुळे सुरक्षित वाहनांची मागणी वाढेल व पाण्यासारख्या गाड्या विकणाऱ्या कंपन्या यापुढे वाहनांच्या सुरक्षिततेकेड लक्ष देतील, अशी अपेक्षा सरकारला आहे.