सौदीची कंपनी भारतात! तीन इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; 150 किमी पर्यंतची रेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 04:02 PM2022-07-23T16:02:30+5:302022-07-23T16:02:47+5:30

ellysium automotives Electric Sccoters Launch: कंपनी या इलेक्ट्रीक स्कूटरची प्री बुकिंग ८ ऑगस्टपासून सुरु करणार आहे. य़ामध्ये ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन बुकिंग करू शकणार आहेत.

Saudi Arebias company ellysium automotives in India! Launch of three electric scooters; Range up to 150 km | सौदीची कंपनी भारतात! तीन इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; 150 किमी पर्यंतची रेंज

सौदीची कंपनी भारतात! तीन इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; 150 किमी पर्यंतची रेंज

googlenewsNext

भारतातील इलेक्ट्रिक टू व्हीलर क्षेत्राचा विस्तार आणि भविष्य पाहता, अनेक कंपन्यांनी या सेगमेंटमध्ये त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच करण्यास सुरुवात केली आहे. आधीच ओला, टीव्हीएस, एथर सारख्या कंपन्यांच्या स्कूटर असताना आता त्यात सौदी अरेबियाच्या कंपनीची भर पडली आहे. 

युएईच्या META4 ग्रुपचा भाग असलेल्या Elysium Automotives ने तीन इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केल्या आहेत. या स्कूटरचे नाव  EVeium Cosmo, EVeium Comet आणि EVeium Czar आहे. या इलेक्ट्रीक स्कूटरची किंमत 1.44 लाख रुपये ते 2.14 लाख रुपये एवढी असणार आहे. 

कंपनी या इलेक्ट्रीक स्कूटरची प्री बुकिंग ८ ऑगस्टपासून सुरु करणार आहे. य़ामध्ये ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन बुकिंग करू शकणार आहेत. यासाठी ९९९ रुपयांचे टोकन भरावे लागणार आहे. 

EVeium Cosmo मध्ये कंपनीने 2.16 kWh चे बॅटरी पॅक लावले आहे. ही स्कूटर एका चार्जमध्ये 80 किलोमीटर रेंज देईल. तसेच 65 किलोमीटर प्रति तासाचा वेग देईल. सहा रंगात ही स्कूटर असेल.
EVeium Comet मध्ये कंपनीने 3.6 kWh चे बॅटरी पॅक लावले आहे. ही स्कूटर 150 किलोमीटरची रेंज देईल. 85 किलोमीटर प्रति वेग असेल. या स्कूटरची किंमत 1.92 लाख रुपयांपासून सुर होईल. 
EVeium Czar स्कूटरमध्ये 3.02 kWh चे बॅटरी पॅक देण्यात आले आहे. या स्कूटरची रेंजदेखील 150 किलोमीटरची असेल. याची किंमत 2.14 लाख रुपये  असेल. 


 

Web Title: Saudi Arebias company ellysium automotives in India! Launch of three electric scooters; Range up to 150 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.