Vespa 946 Dragon Edition : क्रेटा आणि थारपेक्षा महागडी स्कूटर लाँच, किंमत जाणून बसेल धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 10:27 AM2024-07-02T10:27:51+5:302024-07-02T10:28:29+5:30
Vespa 946 Dragon Edition : या स्कूटरचे फक्त १८८८ युनिट्स जगभरात विकले जातील, असे कंपनीने म्हटले आहे.
नवी दिल्ली : व्हेस्पा (Vespa) कंपनीने भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी एक नवीन स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरची किंमत वाचून तुम्हालाही धक्का बसेल. या स्कूटरची किंमत Hyundai Creta आणि Mahindra Thar पेक्षा जास्त आहे. या स्कूटरची किंमत १४ लाखांपेक्षा जास्त आहे. कंपनीच्या या नवीन स्कूटरचे नाव Vespa 946 Dragon Edition आहे.
हाँगकाँगच्या लूनर न्यू इयर सेलिब्रेशन डेपासून प्रेरित असलेली ही लिमिटेड-एडिशनची स्कूटर आहे. या स्कूटरचे फक्त १८८८ युनिट्स जगभरात विकले जातील, असे कंपनीने म्हटले आहे. मात्र कंपनीने भारतीय बाजारात किती युनिट्स विकले जातील, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.
इंजिन डिटेल्स
Vespa 946 Dragon एडिशनमध्ये तुम्हाला १२ इंचाचे व्हील, फ्रंट आणि रिअरमध्ये २२० mm डिस्क ब्रेक मिळतील. या स्कूटरमध्ये १५० सीसी एअर-कूल्ड इंजिन आहे, जे १२.७ bhp पॉवर आणि १२.८ Nm टॉर्क जनरेट करते.
डिझाईन
या Vespa स्कूटरचे हे लिमिटेड-एडिशन मॉडेल गोल्ड कलरमध्ये दिसून येत आहे. तसेच, या स्कूटरवर तुम्हाला ग्रीन कलरमध्ये ड्रॅगन काढलेला दिसेल. ही स्कूटर स्टील प्लेट मोनोकोक फ्रेमपासून बनवण्यात आली आहे.
किंमत
कंपनीने या स्कूटरची किंमत १४ लाख २८ हजार रुपये (एक्स-शोरूम) निश्चित केली आहे. कंपनीकडून ही स्कूटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लिमिटेड-एडिशनचे व्हेस्पा ड्रॅगन वर्सिटी जॅकेटही दिले जाईल. देशभरातील Piaggio Motoplex शोरूममध्ये ग्राहकांसाठी या स्कूटरची बुकिंग सुरू झाली आहे.
Hyundai Creta आणि Mahindra Thar ची किंमत
ह्युंदाई क्रेटाच्या या लोकप्रिय एसयूव्हीच्या बेस व्हेरिएंटची किंमत १० लाख ९९ हजार ९०० रुपये (एक्स-शोरूम) आहे. तर दुसरीकडे, महिंद्रा थारची सुरुवातीची किंमत ११ लाख ३४ हजार ९९९ रुपये (एक्स-शोरूम) आहे. त्यामुळे Vespa स्कूटरची किंमत पाहता, तुम्ही क्रेटा आणि थारचे बेस व्हेरिएंट खरेदी करू शकाल.