Scorpio 2022: 'बिग डॅडी'सह तीन दमदार SUV करणार धमाल! जाणून घ्या किंमत अन् फिचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 06:29 AM2022-06-12T06:29:00+5:302022-06-12T06:29:32+5:30
जर तुमचा एखादी एसयूव्ही खरेदी करायचा प्लॅन असेल तर थोडे दिवस थांबा. कारण येत्या काही दिवसांमध्ये, जून महिन्याच्या अखेरपर्यंत ३ दमदार एसयूव्ही भारतीय बाजारात लाँच होणार आहेत.
सागर सिरसाट, उपसंपादक, मुंबई
जर तुमचा एखादी एसयूव्ही खरेदी करायचा प्लॅन असेल तर थोडे दिवस थांबा. कारण येत्या काही दिवसांमध्ये, जून महिन्याच्या अखेरपर्यंत ३ दमदार एसयूव्ही भारतीय बाजारात लाँच होणार आहेत.
ह्युंडाई व्हेन्यू फेसलिफ्ट २०२२
ह्युंडाईची लोकप्रिय सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही व्हेन्यू २०१९ मध्ये लाँच झाली होती. आता कंपनी ही शानदार गाडी नवीन फेसलिफ्ट प्रकारात उतरवणार आहे. दोन पेट्रोल आणि एका डिझेल इंजिनच्या पर्यायात उपलब्ध असेल.
- लाँच कधी : १६ जून
- अपेक्षित किंमत ७ लाख ते १२ लाख रुपये (एक्स-शोरुम)
महिंद्रा स्कॉर्पिओ-एन
महिंद्राची पॉवरफुल एसयूव्ही स्कॉर्पिओ नवीन रुपात-स्कॉर्पिओ-एन म्हणून लाँच होणार आहे. बिग डॅडी ऑफ एसयूव्ही अशी जाहिरात झालेली ही गाडी प्रथमच पेट्रोलमध्येही तसेच ६ आणि ७ आसनाच्या पर्यायांत येऊ शकते.
- लाँच कधी : २७ जून
- अपेक्षित किंमत १४ ते २० लाख रुपये (एक्स-शोरुम)
मारुती ब्रेझा २०२२
मारुती सुझुकी बहुप्रतिक्षित न्यू जनरेशन ब्रेझा २०२२ लाँच करण्याच्या तयारीत आहे. नवीन ब्रेझात डिझाइनपासून फीचर्सपर्यंत अनेक बदल दिसतील. शिवाय कंपनी पहिल्यांदाच इलेक्ट्रिक सनरुफही देईल. या एसयूव्हीला 'विटारा' नाव नसेल.
- लाँच कधी : ३० जून
- अपेक्षित किंमत : ८ ते ११.५० लाख (एक्स-शोरुम)