सीट कव्हरचा रंगढंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 04:27 PM2017-08-02T16:27:52+5:302017-08-02T16:28:03+5:30

कारमध्ये कंपनीने दिलेल्या सीट्सना कव्हर नसते, पण त्याची गरज नक्कीच असते. त्यासाठी ती निवडताना साजेशी व योग्य अशीच निवडावीत. रंगाप्रमाणेच त्याचे प्रकार व दर्जा हे भागही लक्षात घ्यावेत.

Seat cover | सीट कव्हरचा रंगढंग

सीट कव्हरचा रंगढंग

googlenewsNext

कार नवीन घेतली तरी त्यामध्ये कंपनीने दिलेल्या सीट्सना आपल्या आवडीचे व कारला साजेसे सीट कव्हर टाकल्याशिवाय अनेकांना चैन पडत नाही. कार तयार करताना प्रत्येक कार उत्पादक आपल्या कारच्या सीट्सची रचना वेगळ्या रितीने करीत असतो. त्या कारला साजेशी अशी आसनरचना त्याने केलेली असते. त्या सीट्सचे फॅब्रिक कोणते असावे, त्याचा रंग कोणता असावा, त्यासाठी हेडरेस्ट इनबिल्ट असावी की हेडरेस्ट काढा घालायची असावी,पुढील सीटमध्ये व मागील सीटमध्ये काय फरक असावेत, सीटचा रंग, त्यावरचे टेक्श्चर,त्या सीट्स लेदरच्या की कापडाच्या असाव्यात, त्या सीट्सवर बसल्यानंतर कम्फर्ट मिळावा,त्या साफ करतानाही त्रास होऊ नये इत्यादी विविध बाबींची रचना कार डिझायनरने इंटेरियर डिझाईन तयार करताना काळजीपूर्वक केलेली असते. अर्थात असे असले तरी कार नवीन घेतल्यानंतर त्यावर आपल्या आवडीचे सीट्सचे कव्हर चढले जातेच. साधारण९० टक्के लोक नवी कार घेतल्यावर सीटचे कव्हर आवर्जून टाकतात. 
ही सीट्स कव्हर्स बाजारात कार आली की लगेच त्या मापाची तयारही मिळतात. अर्थात कारच्या खपानुसार ती जास्तीची तयार करून घेतली जात असतात. काहीवेळा ती ग्राहकाच्या मागणीनुसारही तयार करून दिली जातात. त्यात ग्राहकाच्या निवडीनुसार ती तयार केली जातात. त्यात रंगाप्रमाणेच लेदर, मायक्रो लेदर, वेलवेट, सिंथेटिक कापड, ताग आदी मटेरियलही उपलब्ध असते. थोडक्यात तुमचा चॉईस असतो.कार, एसयूव्ही इतकेच कशाला तर ट्रक, मिनी ट्रक, प्रवासी बस, टेम्पो, रिक्षा व दुचाकीसुद्धा.या नव्या सीट्स कव्हरच्या प्रेमातून, आवडीतून सुटत नाहीत. 
कंपनीकडून कारला दिल्या जाणाऱ्या सीट्सवर मुळात कव्हर नसते आतील स्पंज वा संबंधित मऊशार अशा फोमवर असलेले हे सीट कव्हर काढता येत नाही, ते त्या सीटला अटॅचच असते. त्यामुळे मूळ सीट खराब होऊ नये म्हणून या स्वतंत्र कव्हर्सची सोय केली गेली. कंपनीच्या एखाद्या माणसाने कव्हर्स टाकू नका असे सांगितले तरी लोक स्वतंत्रपणे काढता, घालता येणारी, धुता येणारी कव्हर्स टाकणारच, हे ठरलेले आहे. गाडीचा रंग, तुमच्या गाडीचा वापर, तुम्हाला वाटणारी स्वच्छता आदी विविध बाबतींचा विचार करून सीट्सची कव्हर्स निवडावीत. उन्हामध्ये वा उन्हाळ्यामध्ये गरम होणार नाहीत, पावसाळ्या खराब होणार नाहीत, दमटपणा पकडणार नाही, साफ करायला सहज सुलभ आहेत, अशी 
शक्यतो ही कव्हर्स निवडावीत. या कव्हर्सला पुढच्या आसनाच्या कव्हर्समागे कप्पाही दिला जातो. दोरीद्वारे वा इलेस्टिकद्वारे ती फीट केली जातात व ती कव्हर्स बसवणेदेखील एक कौशल्याची बाब झाली आहे. तुम्हाला ही कव्हर्स बदलताही येतात व त्याऐवजी दुसरी टाकता येतात. कारच्या मूळ सीट्सकव्हर्सचे तसे नसते. लेदरच्या सीट्स वगळता फॅब्रिकचा वापर असलेल्या सीट्स खराब झाल्या तर वाईट वाटते व ती साफकरणेही त्रासदायक असते. पण एक मात्र खरे की नवी कार नवी सीट्स कव्हर्स ही मानसिकता बदलणारी नक्की नाही.

Web Title: Seat cover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.