Second Hand Car Market: सेकंड हँड मार्केटमध्ये 'या' गाड्यांना सर्वाधिक मागणी, रिसेल व्हॅल्यूदेखील जबरदस्त...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 03:08 PM2022-11-27T15:08:28+5:302022-11-27T15:09:27+5:30
Second Hand Car Market: भारतात नव्या गाड्यांना जेवढी मागणी असते, तेवढीच मागणी जुन्या गाड्यांनाही आहे.
Best Used Car in India: भारतात जेवढ्या नव्या गाड्या विकल्या जातात तेवढ्याच प्रमाणात जुन्या गाड्याही विकल्या जातात. भारतातील सेकंड हँड कार मार्केट खूप मोठे आहे. नवीन कारचे बजेट नसलेले लोक जुनी कार खरेदी करतात. याशिवाय, काही लोक नवीन ऐवजी जुनी कार खरेदी करणेच अधिक पसंत करतात.
बाजारपेठ दुप्पट होणार
नुकताच जुन्या कार्सशी संबंधित एक रिपोर्ट समोर आली आहे, ज्यामध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सेकंड हँड कारची यादी देण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला या यादीबद्दल सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. TOIच्या रिपोर्टनुसार, FY22 मध्ये, वापरलेल्या कारचे मार्केट कोरोनापूर्वीच्या स्थितीत पोहोचले आहे. सेकंट हँड कारचे मार्केट FY22 मधील 4.1 दशलक्ष युनिट्सवरून FY27 मध्ये 8.2 मिलियन युनिट्सपर्यंत होण्याची अपेक्षा आहे.
या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे
FY22 मध्ये, 49% मागणीसह युटिलिटी वाहनांनी छोट्या कार्स (45%) आणि सेडान (3%) ला मागे टाकले आहे. याच कालावधीत, मोठ्या (8% ते 3%) आणि लहान (65% ते 45%) कारच्या वार्षिक विक्रीतही घट झाली आहे. OLX प्लॅटफॉर्म डेटानुसार प्री-ओन्ड कार सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय UV हे Hyundai Creta, Maruti Brezza, Maruti Ertiga आणि Mahindra XUV500 आहेत. मारुती बलेनो, ह्युंदाई एलिट i20, रेनॉल्ट क्विड, मारुती सुझुकी डिझायर आणि ह्युंदाई ग्रँड i10 या प्री-ओनड सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय लहान कार आहेत. दुसरीकडे, होंडा सिटी ही भारताची आवडती सेडान राहिली आहे.