Hyundai i10 CNG: ७ लाख नव्हे, फक्त २.२ लाखांत खरेदी करा; नवरात्रीला बंपर सूट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 04:58 PM2022-10-02T16:58:51+5:302022-10-02T17:00:03+5:30
भारतात सेकंड हँड कारचा व्यापार सध्यात जोमात आहे. लोक वापरलेल्या गाड्या मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. अशा अनेक वेबसाइट्स आहेत ज्या चांगल्या कंडिशनच्या सेकंड हँड कार देण्याचा दावा करतात.
भारतात सेकंड हँड कारचा व्यापार सध्यात जोमात आहे. लोक वापरलेल्या गाड्या मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. अशा अनेक वेबसाइट्स आहेत ज्या चांगल्या कंडिशनच्या सेकंड हँड कार देण्याचा दावा करतात. जर तुम्ही सेकंड हँड सीएनजी कार शोधत असाल, तर Hyundai i10 एक उत्तम पर्याय आहे. नवीन Hyundai i10 च्या CNG मॉडेलची सुरुवातीची किंमत ७.१६ लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. पण तुम्ही याच कारचं सेकंड हँड मॉडेल केवळ २.२ लाख रुपयांना खरेदी करू शकता. इतकंच काय तर हीच कार आपण फायनान्सवर देखील खरेदी करू शकता. Hyundai i10 CNG वर सध्या तीन उत्तम डील सुरू आहेत.
Hyundai Grand i10 Magna 1.1 CRDi
Hyundai i10 CNG कारची पहिली ऑफर Droom वेबसाइटवर उपलब्ध आहे. ही 2014 मॉडेलची कार आहे, जी दिल्ली सर्कलमध्ये उपलब्ध आहे. ही कार तुम्ही २,६१,०१५ रुपयांना खरेदी करू शकता. हे मॉडेल ७२,००० किमी चालवण्यात आलं आहे. Droom वर नवरात्रीच्या ऑफर्सचा फायदा घेऊन तुम्ही ही CNG कार अगदी स्वस्त दरात खरेदी करू शकता. नवरात्री कूपन वापरून, तुम्हाला २,९७५ रुपयांची थेट बचतही करता येईल.
Hyundai i10 Era
OLX वर एक उत्तम डील उपलब्ध आहे, ज्यामध्ये Hyundai i10 CNG कार फक्त २.५१ लाख रुपयांमध्ये खरेदी केली जाऊ शकते. ही देखील २०१४ सालची कार आहे आणि फरिदाबाद, हरियाणा RTO मध्ये नोंदणीकृत आहे. ही कार दिल्ली सर्कलमध्ये उपलब्ध असली तरी राईडबद्दल बोलायचं झालं तर या कारनं आतापर्यंत केवळ ६०,४७८ किलोमीटरचे अंतर कापलं आहे. यामध्ये तुम्हाला रियर व्ह्यू कॅमेरा, पॉवर विंडो, पॉवर स्टीयरिंग आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स यांसारख्या गोष्टींचाही फायदा मिळेल.
Hyundai i10 MAGNA 1.2 KAPPA2
Hyundai i10 CNG वर आणखी एक उत्तम डील Cars24 वर उपलब्ध आहे. तेथे 2012 सालचं मॉडेल केवळ २.२३ लाख रुपयांना खरेदी करता येईल. कार फायनान्सवरही खरेदी करू शकता. Hyundai i10 CNG चं हे मॉडेल दरमहा फक्त ४,३७५ रुपयांच्या सुलभ हप्त्यांवर उपलब्ध आहे. या कारनं ८५,३८५ किमी प्रवास पूर्ण केला आहे. सर्व्हीसबद्दलची काळजी करण्याची गरज नाही कारण शेवटची सर्व्हीस नुकतीच १४ सप्टेंबर २०२२ ला केली गेली आहे.
(टीप: Hyundai i10 CNG शी संबंधित सर्व ऑफर वेगवेगळ्या वेबसाइटच्या माहितीनुसार येथे देण्यात आल्या आहेत. कोणतीही वापरलेली कार किंवा बाईक खरेदी करण्यापूर्वी तिची स्थिती आणि सर्व आवश्यक कागदपत्रं स्वतः तपासा. योग्य माहितीशिवाय, वाहन मालकाला भेटल्याशिवाय किंवा वाहन न पाहता कोणताही व्यवहार करू नका)