अयोध्येची सुरक्षा; काना-कोपऱ्यात Mahindra चे 'मेड इन इंडिया' बुलेटप्रूफ वाहन तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 06:50 PM2024-01-22T18:50:18+5:302024-01-22T18:52:54+5:30
या खास वाहनावर बंदुकीच्या गोळ्यांशिवाय ग्रेनेडचाही परिणाम होत नाही.
Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलला विराजमान झाले. या सोहळ्यादरम्यान शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. एआय कॅमेऱ्यापासून ते ड्रोनपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. दरम्यान, या सोहळ्यासाठी खास मेड इन इंडिया बुलेट प्रूफ वाहने तैनात करण्यात आली आहेत. ही बुलेटप्रूफ वाहने Mahindra कंपनीने तयार केली आहेत. Mahindra Marksman असे या खास गाडीचे नाव आहे. या वाहनाचे वैशिष्ट्य म्हणजे बंदुकीच्या गोळ्यांशिवाय त्यावर ग्रेनेडचाही परिणाम होत नाही.
Mahindra Marksman ची वैशिष्ट्ये
Mahindra Marksman हे आर्मर्ड कॅप्सूल-आधारित हलके बुलेटप्रूफ वाहन आहे. लहान शस्त्रे, आग आणि ग्रेनेड हल्ल्यांपासून निमलष्करी, पोलीस आणि संरक्षण दलांचे संरक्षण करण्यासाठी याचा वापर केला जातो. वाहन सर्व बाजूंनी संरक्षित आहे. विंड स्क्रीनवरही नेट आहे. महिंद्रा मार्क्समनला मशिन गन माउंट, 5 साइड आर्मरिंग, सात फायरिंग क्रू पोर्ट, रिअर व्ह्यू कॅमेरा मिळतो.
इंजिन
हे वाहन दोन इंजिन पर्यायांसह येते. पहिले, 2.2 लीटर, M-Hawk CRDe, टर्बो चार्ज्ड इंटरकूल्ड DI आणि 2.6 लिटर, टर्बो चार्ज्ड इंटरकूल्ड DI आहे. याशिवाय, यात 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 4WD उपलब्ध आहे. वाहनाचे वजन 3200 किलो असून, याचा टॉप स्पीड 120 किमी/तास आहे. या वाहनाचा वापर सीमा सुरक्षा दल, दहशतवादविरोधी, दंगल नियंत्रण आणि इतर कामांसाठी केला जाऊ शकतो. याची किंमत रु. 25 लाख ते रु. 40 लाखांपर्यंत असू शकते.