ही इलेक्ट्रिक कार पाहून सर्वांच्याच हृदयाचे ठोके वाढले! देते 738km ची रेन्ज, जाणून घ्या खासियत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 06:23 PM2023-11-14T18:23:01+5:302023-11-14T18:24:38+5:30
ही कार 738 किमी. पर्यंतची रेन्ज देते, असा दावा कंपनीने केला आहे.
स्वीडनची कार उत्पादक कंपनी व्होल्वोने (Swedish Car Maker Volvo) अखेर आपल्या पहिल्या संपूर्ण इलेक्ट्रिक प्रीमियम MPV EM90 वरून पडदा उचलला आहे. ही कार प्रामुख्याने चीनमध्ये विकली जाणार आहे. ही कार 738 किमी. पर्यंतची रेन्ज देते, असा दावा कंपनीने केला आहे. कारच्या पुढील बाजूला, वोल्वो लोगोसह एक क्लोज ग्रील, फ्रंट बम्परवर सिग्निचर एलईडी हेडलॅम्प आणि हॅमर LED DRL आहेत.
कारच्या समोरील बाजूस इलेक्ट्रिक एमपीव्हीमध्ये मोठा व्होल्व्हो लोगो देण्यात आला आहे. या सोबतच एक बंद ग्रिल, फ्रंट बम्परवर सिग्निचर एलईडी हेडलॅम्प आणि थोरचे हॅमर LED DRL आहे. या खास बॉक्सी एमपीव्हीमध्ये स्लायडिंग सेकंड लाइनचे दरवाजे, ब्लॅक पिलर आणि 20 इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहे. कारच्या मागच्या बाजूला व्हर्टिकल एलईडी टेललॅम्प्स, शार्क-फिन अँटीना आणि एक मोठी रियर विंडशील्ड मिळते.
सिटिंग ऑप्शनसंदर्भात बोलायचे झाल्यास, या कारमध्ये 3-लाइनमध्ये 6 पॅसेन्जर बसू शकतात. इंटिरिअरसंदर्भात बोलायचे झाल्यास, फ्रंट सीटवर 15.4 इंचाचे टचस्क्रीन आणि 15.6 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. जी रूफवर लावलेली असते. याशिवाय यात Bowers & Wilkins चे 21 स्पीकर्स, मल्टिपल एम्बियंट लाइट्स आणि संपूर्ण केबिनमध्ये पसरलेले पॅनोरॅमिक सनरूफ आहेत.
फूल चार्ज केल्यास 738 किमी.ची रेन्ज -
EM90 इलेक्ट्रिक एमपीव्हीला 116kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही कार 268bhp एवढी पॉवर जनरेट करण्यात सक्षम आहे. जी केवळ 8.3 सेकेंदांतं 0-100 किमी. प्रति तास एवढी स्पीड जनरेट करते. ही बॅटरी 30 मिनिटांपेक्षाही कमी वेळात 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. ही बॅटरी संपूर्ण जार्ज झाल्यास 738 किमी. पर्यंतची रेन्ज देते.