स्टिअरींगवरील चांगल्या पकडीसाठी कव्हर ची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 11:45 AM2017-09-25T11:45:30+5:302017-09-25T16:07:13+5:30

स्टिअरिंगसाठी विविध प्रकारची कव्हर्स बाजारात मिळतात. स्वतःची कार असली व नियमित आपणच वापरत असाल तर कारच्या स्टिअरिंगसाठी चांगले कव्हर जरूर घ्या. रेक्झिन, फोम लेदर, सिंथेटिक कापड, लेदर, सिलिकॉन, या मटेरिअलमध्ये ही कव्हर्स मिळतात

Selection of good steering cover for better grip | स्टिअरींगवरील चांगल्या पकडीसाठी कव्हर ची निवड

स्टिअरींगवरील चांगल्या पकडीसाठी कव्हर ची निवड

googlenewsNext
ठळक मुद्देकार चालवताना मूळ स्टिअरिंगला कंपनीने स्टिअरिंग कव्हर दिले नसेल तर कव्हर जरूर बसवाहाताला येणारा घाम, लागणारे पाणी, चिकट द्राव यामुळे स्टिअरिंगवर असणारी ग्रीप कमी होऊ शकतेहात स्टिअरिंगच्या गुळगुळीत प्लॅस्टिकच्या पृष्ठभागावरून सरकू शकतो, स्लीप होऊ शकतो

स्टिअरिंगसाठी विविध प्रकारची कव्हर्स बाजारात मिळतात. स्वतःची कार असली व नियमित आपणच वापरत असाल तर कारच्या स्टिअरिंगसाठी चांगले कव्हर जरूर घ्या. रेक्झिन, फोम लेदर, सिंथेटिक कापड, लेदर, सिलिकॉन, या मटेरिअलमध्ये ही कव्हर्स मिळतात. स्टिरिंगवर पूर्णपणे रिंगसारखी बसणारी ही कव्हर्स जी आतील बाजूने रबराचा वा अन्य सिंथेटिक मटेरिअलचा वापर करून बनवलेली असतात. त्याचप्रमाणे स्टिअरिंग व्हीलवर वायर वा छान मजबूत दोरीने विशिष्ट पद्धतीने गुंडाळून बसवता येतात, अशा प्रकारचीही ही स्टिअरिंग कव्हर्स बाजारात मिळतात. कमाल एक ते दोन वर्ष टिकणारी ही कव्हर्स दोनशे रुपयांपासून उपलब्ध आहेत.

कार चालवताना मूळ स्टिअरिंगला कंपनीने स्टिअरिंग कव्हर दिले नसेल तर कव्हर जरूर बसवा. त्यामुळे हाताला येणारा घाम, लागणारे पाणी, चिकट द्राव यामुळे स्टिअरिंगवर असणारी ग्रीप कमी होऊ शकते. हात स्टिअरिंगच्या गुळगुळीत प्लॅस्टिकच्या पृष्ठभागावरून सरकू शकतो, स्लीप होऊ शकतो. काहीवेळा पाहिजे तशी पकड त्यावर घेता येत नाही. वाहन नियंत्रणासाठी स्टिअरिंग महत्त्वाचे असते. वाहन वळवणे ही एक महत्त्वाची कृती आहे व ती करताना त्या स्टिअरिंगवर पकड आत्मविश्वासाने जमवू शकलात तर ड्रायव्हिंगलाही एक आगळी गंमत येते. कंटाळा येणे, ड्रायव्हिंग फटिग येणे, या बाबीही काही प्रमाणात कमी होतात.

अर्थात ही कव्हर्स घेताना नीट पाहून घ्या, तुम्हाला सुटेबल व योग्य वाटतील त्या कव्हर्सची निवड करा. स्टिअरिंग व्हीलवर रिंगसारखी कव्हर बसवताना ती घट्ट बसणारी हवीत. ती सैल असली तर स्टिअरिंवर फिरतील व ग्रीपच येणार नाही. कालांतराने कव्हरवर असलेली शिलाई सुटते वा तुटते व त्याच्या कडा हाताला लागूही शकतात. अशावेळी ते बदलाच. कव्हर घेतानाच जर त्याची योग्य निवड केली तर अधिक चांगल्या दर्जाचे वा चांगल्या पद्धतीचे घेतले तर ड्रायव्हिग करताना कंटाळा येणार नाही, अवजडपणा वाटणार नाही.

कव्हरची हाताला होणारी संवेदना व त्याचा स्पर्श सुखावह वाटला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये स्टिअरिंगवर उन पडले की तापते, हाताला चटकाही बसतो. तर पावसाळ्यात एक प्रकारचा बुळबुळीतपणा वा बुरशीसारखी ओशट होण्याचा प्रकार होतो. यासाठी कव्हर हवे व हवामानाचा विचार करूनही त्याची निवड करा तेच उत्तम.

Web Title: Selection of good steering cover for better grip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.