जुनी कार घेण्याचे अनेक फायदे, Ashneer Grover नं सांगितलं कारण; ऐकून तुमचंही मन बदलेल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 07:23 PM2023-02-06T19:23:59+5:302023-02-06T19:24:26+5:30

ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत त्यांनी जुनी कारही घ्यावी, याचे अनेक फायदे आहेत, जाणून घ्या असं का म्हटलंय अशनीर ग्रोव्हर यांनी.

shark tank india 1 shark Ashneer Grover explains the many benefits of buying a used car after knowing you will be amazed instagram | जुनी कार घेण्याचे अनेक फायदे, Ashneer Grover नं सांगितलं कारण; ऐकून तुमचंही मन बदलेल

जुनी कार घेण्याचे अनेक फायदे, Ashneer Grover नं सांगितलं कारण; ऐकून तुमचंही मन बदलेल

googlenewsNext

बजेट कमी असेल तरच सेकंड हँड कार खरेदी करावी, असा बहुतेकांचा समज असतो, पण हे १०० टक्के बरोबर आहे का? नाही, ही बातमी वाचल्यानंतर तुमचा यावरचा विश्वास उडून जाईल, कारण भारतातील बिझनेस टायकून आणि शार्क टँक सीझन-१ मधील शार्क अशनीर ग्रोव्हर यांनी एका मुलाखतीदरम्यान याचे मोठे कारण सांगितले आहे. ज्यानंतर सेकंड हँड कार खरेदी करणाऱ्यांना नक्कीच आनंद होईल. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनीही जुनी कार घ्यावी, याचे अनेक फायदे आहेत. असे ते म्हणाले. पण असे ते का म्हणाले हे जाणून घेऊ.

अशनीक ग्रोव्हर यांनी स्वतःबद्दल एक अनोखी माहिती सांगितली आहे. ज्यामुळे ते अनेक अब्जाधीशांपेक्षा वेगळे आहेच. आपण इतर उद्योगपती आणि व्यावसायिकांप्रमाणे नवीन मॉडेल्सऐवजी वापरलेल्या कार खरेदी करतो, असे अशनीर ग्रोव्हर यांनी म्हटलेय. त्यांनी या मागचे कारणही सांगितले आहे. नव्या गाड्यांच्या तुलनेत जुन्या गाड्यांवर स्क्रॅच पडले तर तितका त्रास होत नाही. हे प्राथमिक कारण आहे ज्यामुळे आपण नवी कार खरेदी करत नाही. जर नव्या कारवर स्क्रॅच आला तर जवळपास आठवडाभर आपला मूड खराब राहतो, असेही ते म्हणाले. 

अनेक महागड्या कार्स
इंस्टाग्रामवर संवाद साधताना, अशनीर ग्रोव्हर यांनी असेही सांगितले की त्यांनी अनेक मोठ्या संस्थापकांना त्यांच्या व्यवसायाचा नफा कमावल्यानंतर स्पोर्ट्सकार खरेदी करताना पाहिले आहे. त्यांनी झोमॅटोचे संस्थापक दीपंदर गोयल यांची गोष्टही सांगितली. कंपनीसाठी फंडींग मिळवल्यावर त्यांनी कशी रेंज रोव्हर खरेदी केली हे त्यांनी सांगितलं. आपल्याला स्पोर्ट्स कार आवडत असून संधी मिळाल्यास ती विकत घेऊ असे त्यांनी सांगितले. त्यांच्या कारच्या ताफ्यात Mercedes-Maybach S650, Mercedes-Benz GLS 350, Porsche Cayman S आणि Audi A6 सारख्या कार्स आहेत.

Web Title: shark tank india 1 shark Ashneer Grover explains the many benefits of buying a used car after knowing you will be amazed instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.