Shema Zoom Electric Scooter देतेय सिंगल चार्जमध्ये 75 किमीची रेंज, जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 04:05 PM2022-10-01T16:05:48+5:302022-10-01T16:06:35+5:30

Shema Zoom Electric Scooter : आज आम्ही शेमा झूम (Shema Zoom) इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल बोलत आहोत, जी आकर्षक डिझाइन आणि कमी किमतीत उत्तम रेंजसह येते.

Shema Zoom Electric Scooter Gives A Range Of 75 Km In A Single Charge Know Price Features And Specification Details | Shema Zoom Electric Scooter देतेय सिंगल चार्जमध्ये 75 किमीची रेंज, जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Shema Zoom Electric Scooter देतेय सिंगल चार्जमध्ये 75 किमीची रेंज, जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

googlenewsNext

नवी दिल्ली : सध्या इलेक्ट्रिक स्कूटरची क्रेझ वाढली आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल सांगत आहोत, जी कमीत कमी बजेटमध्ये तुमच्यासाठी एक पर्याय असू शकतो. यामध्ये आज आम्ही शेमा झूम (Shema Zoom) इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल बोलत आहोत, जी आकर्षक डिझाइन आणि कमी किमतीत उत्तम रेंजसह येते. 

जर तुम्ही कमीत कमी बजेटमध्ये चांगली इलेक्ट्रिक स्कूटर शोधत असाल, तर या शेमा झूम इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत, वैशिष्ट्ये, रेंज आणि स्पेसिफिकेशनची प्रत्येक माहिती येथे जाणून घ्या. कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कूटर 67,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) च्या सुरुवातीच्या किंमतीसह बाजारात आणली आहे. ऑन रोड या स्कूटरची किंमत 70,553 रुपयांपर्यंत जाते. 

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने 48V, 25Ah क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे. ही बॅटरी 250W पॉवर आउटपुटसह इलेक्ट्रिक हब मोटरशी जोडलेली आहे.  बॅटरीच्या चार्जिंगबाबत कंपनीचा दावा आहे की, सामान्य चार्जरने चार्ज केल्यावर हा बॅटरी पॅक 4 ते 5 तासांत पूर्ण चार्ज होतो. कंपनीकडून या बॅटरी पॅकवर 3 वर्षांची वॉरंटीही दिली जाते.

स्कूटरच्या रेंज आणि टॉप स्पीडबाबत कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 75 किमीची रेंज देते. या रेंजसह 25 किमी प्रतितासचा टॉप स्पीड मिळतो आहे. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टममध्ये, कंपनीने त्याच्या दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेक्स बसवले आहेत, ज्यामध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम जोडण्यात आली आहे. यासोबतच अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत.

शेमा झूम इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दिलेल्या फीचर्सबद्दल सांगायचे तर, कंपनीने यामध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, पुश बटण स्टार्ट, स्मार्ट चार्जर यांसारखे फीचर्स दिले आहेत. स्कूटरच्या डायमेंशनबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने ती 640 मिमी रुंद, 1760 मिमी लांब आणि 750 मिमी उंच केली आहे. या स्कूटरची लोड कॅरिंग कॅपिसिटी 150 किलोग्राम आहे.

Web Title: Shema Zoom Electric Scooter Gives A Range Of 75 Km In A Single Charge Know Price Features And Specification Details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.