नेपाळमधील कारच्या किंमती ऐकून हवेतच उडाल; टाटा सफारी १ कोटींना, नेक्सॉनच्या पैशांत मर्सिडीज येईल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 03:25 PM2022-08-26T15:25:50+5:302022-08-26T15:26:22+5:30
Car Price in Nepal: मेड इन इंडिया वाहने जगातील अनेक देशांमध्ये विकली जातात. त्यात शेजारचा नेपाळही आहे.
भारतात एक दोन महिन्यांत कार कंपन्या वाहनांच्या किंमती वाढवत आहेत. आता सर्वात स्वस्त कार ही साडेतीन चार लाखांपासून सुरु होते. हॅचबॅक ८-९ लाखांत, त्यापेक्षा थोड्य़ा छोट्या कार ५-७ लाखांत आणि एसयुव्ही या १४ लाखांपासून पुढे सुरु होतात. त्या आपल्याला महाग वाटतात. मग नेपाळींना काय वाटत असेल... नेपाळमधील कारच्या किंमती वाचून तर तुम्ही हवेतच उडाल.
मेड इन इंडिया वाहने जगातील अनेक देशांमध्ये विकली जातात. त्यात शेजारचा नेपाळही आहे. परंतू नेपाळ त्या कारवर प्रचंड कर आकारतो. जवळपास तिप्पटीहून अधिक कर वसूल केला जातो आणि कार विकल्या जातात. मग वरच्या किंमतींना तिपटीने गुणा...
Tata Safari ही एसयुव्ही भारतात १५ लाखांपासून सुरु होते, त्याची किंमत नेपाळात 63.56 लाख रुपये होते. तिचे सर्वात महागडे अॅडव्हेंचर व्हर्जन 81.99 सुरुवातीची किंमत ते वरचे व्हर्जन १ कोटी नेपाळी रुपयांना विकले जाते. Kia Sonet भारतात एक्स शोरुम 7.49 रुपयांना विकली जाते. तर नेपाळात ती 36.90 लाखांना. वरच्या मॉडेलना तसतशा वाढत्या किंमती. परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या हायफाय गाड्यांवर तर 298 टक्के कर लावला जातो.
मारुति-सुजुकीच्या Vitara Brezza ची किंमत 43 लाख रुपये आहे. भारतात हीच कार आठ लाखांपासून मिळते. Tata Nexon ची किंमत ३६ लाख रुपये आहे. Tata Nexon XZA+ ची किंमत 53.90 लाख रुपये आहे. नेपाळचेच कशाला पाकिस्तानमध्ये अल्टो तर १५ लाख पाकिस्तानी रुपयांपासून सुरु होते. वॅगन आरची किंमत २१ लाख, स्विफ्ट तर 27.74 रुपयांपासून सुरु होते.