आश्चर्याचा धक्का! हिरो ईलेक्ट्रीकने स्कूटरच्या किंमती वाढवायच्या सोडून 'कमी' केल्या, का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 12:02 PM2023-06-01T12:02:18+5:302023-06-01T12:02:54+5:30

Hero Electric Scooters Price Cut: भारत सरकारने अलीकडेच FAME II योजनेंतर्गत इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी सबसिडी कमी केली आहे, ज्यामुळे संपूर्ण क्षेत्रातील किमतींमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.

Shock of surprise! Why did Hero Electric not increasing scooter prices after subsidy cut | आश्चर्याचा धक्का! हिरो ईलेक्ट्रीकने स्कूटरच्या किंमती वाढवायच्या सोडून 'कमी' केल्या, का?

आश्चर्याचा धक्का! हिरो ईलेक्ट्रीकने स्कूटरच्या किंमती वाढवायच्या सोडून 'कमी' केल्या, का?

googlenewsNext

इलेक्ट्रीक वाहनांना सरकारकडून मिळत असलेली सबसिडी आजपासून कमी झाली आहे. यामुळे या किंमतीचा फरक कंपन्या त्यांच्या वाहनांमध्ये जोडणार असून इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती कमी व्हायच्या सोडून कमालीच्या वाढणार आहेत. असे असताना हिरो ईलेक्ट्रीकने आश्चर्याचा धक्का दिला आहे. सबसिडी कमी झाली तरी कंपनी आपल्या ईलेक्ट्रीक स्कूटरच्या किंमती वाढविणार नाहीय, अशी घोषणा कंपनीने केली आहे. 

केंद्र सरकारने इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु केलेल्या फेम २ सबसिडीमध्ये कपात केली आहे. परंतू, कंपनीने दरवाढ केली तर पुन्हा इलेक्ट्रीक वाहनांकडे ग्राहकांचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल म्हणून हा निर्णय घेतला आहे. 

भारत सरकारने अलीकडेच FAME II योजनेंतर्गत इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी सबसिडी कमी केली आहे, ज्यामुळे संपूर्ण क्षेत्रातील किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सरकारची ही सबसिडी ही सर्वात महाग पार्ट असलेल्या वाहनांच्या बॅटरीवर होती. याद्वारे कंपन्यांना व ग्राहकांना बॅटरी फ्रीच मिळत होती. 

भारत देश ही प्रामुख्याने दुचाकींची बाजारपेठ आहे. हे लक्षात घेऊन लोकांना परवडेल अशा किंमतीत हिरो कंपनी स्कूटर उपलब्ध करत आहे. परंतू, अशा अनेक कंपन्या आहेत ज्या सबसिडी मिळूनही लाख-दीड लाखांच्या आसपास त्यांच्या स्कूटर विकत आहेत. त्यांना मोठा फटका बसणार आहे. 

Optima CX 5.0 (Optima CX 5.0), Optima CX 2.0 (Optima CX 2.0) आणि NYX (NYX) या नुकत्याच सादर केलेल्या मॉडेल्समध्ये अत्याधुनिक जपानी मोटर तंत्रज्ञान आहे. जर्मन ECU तंत्रज्ञान अतुलनीय कामगिरीसाठी ओळखले जाते. 

Web Title: Shock of surprise! Why did Hero Electric not increasing scooter prices after subsidy cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.