Shraddha Kapoor ने खरेदी केली 4.5 कोटींची Supercar; काय आहे खास? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 18:51 IST2023-10-25T18:51:25+5:302023-10-25T18:51:47+5:30
Shraddha Kapoor New Car: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या ताफ्यात महागडी सुपरकार आली आहे.

Shraddha Kapoor ने खरेदी केली 4.5 कोटींची Supercar; काय आहे खास? जाणून घ्या...
Shraddha Kapoor New Car- Lamborghini Huracan Tecnica: अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्याकडे अनेक आलिशान गाड्यांचा ताफा आहे, यात आणखी एका गाडीची भर पडली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर श्रद्धाने स्वतःला एक सुपरकार भेट दिली आहे. आपल्या नव्या कोऱ्या Lamborghini सोबत श्रद्धाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
श्रद्धा कपूरकडे अनेक गाड्या आहेत, पण ही नवीन Lamborghini तिची सर्वात महागडी गाडी आहे. श्रद्धाने लाल रंगाची Lamborghini Huracan Tecnica सुपरकार खरेदी केली आहे, ज्याची किंमत 4.5 कोटी रुपये आहे. नवीन कारला घेऊन श्रद्धाने फेरफटकाही मारला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या गाडीत काय खास आहे?
ही कार गेल्यावर्षी भारतात लॉन्च कर्यात आली होती. ही स्टँडर्ड EVO च्या तुलनेत जास्त पॉवरफुल व्हर्जन आहे. Lamborghini Huracan Tecnica मध्ये 640 एचपी, 5.2-लिटर, नॅच्युरली एस्पिरेटेड V10 इंजिन आहे, जे 7-स्पीड ड्यूल-क्लच ऑटोमेटिक गिअरबॉक्ससह येते. हे मागच्या चाकांना पॉवर देते. लॅम्बोर्गिनीने हरीकन टेक्निकामध्ये रिअर-व्हील स्टीअरिंग आणि स्टँडर्ड कार्बन सिरेमिक ब्रेक्स दिले आहेत.
कारच्या परफॉर्मेंसबद्दल बोलायचे झाल्यास, Lamborghini Huracan Tecnica फक्त 3.2 सेकंदात 0-100 किमी प्रति तास, तर फक्त 9.1 सेकंदात 200 किमी प्रति तास वेगाने धावू शकते. या सुपरकारचा टॉप स्पीड 325 किमी प्रति तास आहे.