Simple One इलेक्ट्रिक स्कूटर 'या' दिवशी होणार लाँच, सिंगल चार्जवर 240 किमी रेंजचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 10:16 AM2023-05-01T10:16:38+5:302023-05-01T10:17:34+5:30

Simple One electric scooter : जर तुम्हीही तुमची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या स्कूटरचा विचार करू शकता. 

Simple One electric scooter to be launched on 23 may, claims 240 km range on single charge | Simple One इलेक्ट्रिक स्कूटर 'या' दिवशी होणार लाँच, सिंगल चार्जवर 240 किमी रेंजचा दावा

Simple One इलेक्ट्रिक स्कूटर 'या' दिवशी होणार लाँच, सिंगल चार्जवर 240 किमी रेंजचा दावा

googlenewsNext

नवी दिल्ली : अखेर प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर सिंपल वनने आपली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची घोषणा केली आहे. ही तीच इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी कंपनीने काही वर्षांपूर्वी सादर केली होती, ज्यावेळी खूप लोकांनी स्टूकरची बुकिंग केली होती. बऱ्याच दिवसांपासून लोक या स्कूटरच्या अपडेटची वाट पाहत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर 23 मे रोजी लाँच होणार आहे. जर तुम्हीही तुमची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या स्कूटरचा विचार करू शकता. 

बॅटरी पॅक आणि रेंज
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दोन बॅटरी पॅक मिळतात. यामध्ये 4.8 kWh बॅटरी पॅक आणि 1.6 kWh स्वॅप करण्यायोग्य बॅटरी पॅकसह येतात. स्कूटरचा 4.8 kWh बॅटरी पॅक सिंगल चार्जवर 240 किमीची रेंज ऑफर करण्यास सक्षम आहे. तसेच, सीटखाली 1.6 kWh स्वॅप करण्यायोग्य बॅटरी पॅक ठेवला आहे, जो तुमच्या सोयीनुसार कुठेही काढता येईल आणि चार्ज करता येऊ शकतो.

या कारणामुळे डिलिव्हरीला झाला उशीर
सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिलिव्हरीला उशीर होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे सरकारचा बॅटरी अहवाल आहे. अलीकडच्या काळात, इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यांच्या तपासणीत वाहनांमध्ये वापरलेल्या बॅटरीमध्ये दोष असल्याचे आढळून आले आहे. यानंतर सरकारने ई-वाहन उत्पादकांवर कडकपणा दाखवला. त्यामुळे सिंपल वनने आपल्या वाहनांची डिलिव्हरी थांबवली आणि बॅटरी पुन्हा तपासण्याचा निर्णय घेतला.

स्कूटरमधील फीचर्स
फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या आगामी ई-स्कूटरला टेल मॅपसह एलईडी हेडलॅम्प, 4G कनेक्टिव्हिटीसह 7-इंच टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, म्युझिक आणि कॉलसाठी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ऑनबोर्ड नेव्हिगेशन सिस्टम, ड्राइव्ह मोड आणि बरेच काही फिचर्स देण्यात आले आहेत.

Web Title: Simple One electric scooter to be launched on 23 may, claims 240 km range on single charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.