Simple One Electric Scooter Test Ride: वर्षभर वाट पाहिली! सिंपल वन इलेक्ट्रीक स्कूटरची टेस्ट ड्राईव्ह सुरु होणार; तारीख जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 03:18 PM2022-05-30T15:18:04+5:302022-05-30T15:21:34+5:30

Simple One test drive in Maharashtra: सिंपल वनची टेस्ट ड्राईव्ह देशातील १३ शहरांमध्ये सुरु होणार आहे. गेल्या ९ महिन्यांपासून हजारो लोक या स्कूटरची वाट पाहत होते.

Simple One electric scooter's test drives to begin from July 20; Simple One test drive in Mumbai, Pune's from  5, 6 August | Simple One Electric Scooter Test Ride: वर्षभर वाट पाहिली! सिंपल वन इलेक्ट्रीक स्कूटरची टेस्ट ड्राईव्ह सुरु होणार; तारीख जाहीर

Simple One Electric Scooter Test Ride: वर्षभर वाट पाहिली! सिंपल वन इलेक्ट्रीक स्कूटरची टेस्ट ड्राईव्ह सुरु होणार; तारीख जाहीर

googlenewsNext

ओलाला थेट टक्कर देणारी सिंगल एनर्जीने एकाच दिवशी भारतात स्कूटर लाँच केल्या होत्या. परंतू, ओला स्कूटरमधील समस्यांवरील समस्या पाहून सिंपलने सावध पावले टाकत टेस्ट राईड, डिलिव्हरी खूपच लांबविल्या होत्या. त्यातची इलेक्ट्रीक स्कूटरला आगी लागण्याचे प्रमाण पाहून उन्हाळा टाळण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात होते. आता या कंपनीच्या सिंपल वन या सर्वाधिक रेंजच्या स्कूटरची टेस्ट ड्राईव्ह सुरु होणार आहे. 

सिंपल वनची टेस्ट ड्राईव्ह २० जुलैपासून देशातील १३ शहरांमध्ये सुरु होणार आहे. गेल्या ९ महिन्यांपासून हजारो लोक या स्कूटरची वाट पाहत होते. सर्वाधिक म्हणजेच २३६ किमीची रेंज ही स्कूटर देत असल्याने लोकांनी यास पसंती दर्शविली आहे. टेस्ट ड्राईव्ह संपल्यावर ग्राहकांना स्कूटर डिलिव्हर केली जाणार आहे. या स्कूटरची किंमत 1.09 लाख रुपये ते 1.44 लाख रुपये (एक्स शोरूम) ठेवण्यात आली आहे. 

मुंबई, पुण्यासाठी ऑगस्ट उजाडणार...
सिंपल वन इलेक्ट्रीक स्कूटरची टेस्ट राईड ही २०-२२ जुलैला बंगळुरूमध्ये सुरु होईल. २६-२७ जुलैला चेन्नई, ३१ जुलै- १ ऑगस्ट हैदराबाद, ५-६ ऑगस्ट पुणे आणि मुंबईमध्ये सुरु होणार आहे. १० ते ११ ऑगस्टला पणजी यानंतर अन्य शहरांमध्ये टेस्ट ड्राईव्ह सुरु केली जाईल. सिंपल वन इलेक्ट्रीक स्कूटर 1,947 रुपयांत बुक करता येते. 

सिंपल वन मध्ये ७ इंचाचा डिजिटल डॅशबोर्ड देण्यात आला आहे. यामध्ये नेव्हिगेशन, ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी, एसओएस मेसेज, जिओ फेन्सिंग आदी सुविधा आहेत. यामध्ये ड़ॉक्यूमेंट स्टोरेजसह टायर प्रेशर देखील दिसणार आहे. 4.8kWh ची लिथिअम आयन बॅटरी देण्यात आली आहे जी पोर्टेबल देखील आहे.  सिंगसल चार्जवर ही स्कूटर इको मोडमध्ये 203 किलोमीटर आणि IDC कंडिशनमध्ये 236 किलोमीटर चालवू शकता. सिंपल वनची टॉप स्पीड 105kmph आहे. 

Web Title: Simple One electric scooter's test drives to begin from July 20; Simple One test drive in Mumbai, Pune's from  5, 6 August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.