‘समोसे-जिलेबी’ सारखी विकली जातेय जबरदस्त फीचर्स असलेली ही कार; जाणून घ्या किंमत अन् खासियत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 04:01 PM2022-04-04T16:01:09+5:302022-04-04T16:03:04+5:30
कंपनीने कारचा बेस अॅक्टिव्ह प्रकार लॉन्च केला आहे जो 1.0-लीटर TSI इंजिनसह येतो. ही नवीन कार 1.5-लिटर इंजिनसह देखील बाजारात येणार आहे.
नवी दिल्ली - स्कोडाने फेब्रुवारी 2022 मध्ये भारतात सर्व नवीन स्लाव्हिया प्रीमियम सेडान कार लाँच केली आहे. या कारला ग्राहकांची प्रचंड पसंती मिळाली आहे. कार लॉन्च झाल्यापासून अवघ्या 1 महिन्यात कंपनीने 10,000 बुकिंग्स गाठले आहेत. नवीन स्लाव्हिया कॉम्पॅक्ट सेडानची एक्स-शोरूम किंमत 10.69 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. (Skoda Slavia Bookings)
कंपनीने कारचा बेस अॅक्टिव्ह प्रकार लॉन्च केला आहे जो 1.0-लीटर TSI इंजिनसह येतो. ही नवीन कार 1.5-लिटर इंजिनसह देखील बाजारात येणार आहे. जी मॅन्युअल आणि DSG ट्रान्समिशनसह सुसज्ज असेल. परंतु कंपनी ही कार 3 मार्चला भारतात लॉन्च करणार आहे.
ओनरशिप किंमत 46 पैसा/किमी!
स्कोडाची ही कार आतापर्यंत 5 हजार ग्राहकांनी बुक केली आहे. कंपनीने या कारवर 4 मेंटेनन्स पॅक दिले आहेत. यात या कारची ओनरशिप किंमत 46 पैसे/किमी असल्याचा दावा केला आहे. या पॅकेजेसमध्ये कारच्या स्पेअर पार्ट्सचा, इंजिन ऑईल आणि लेबर कॉस्टचा समावेश करण्यात आला आहे. या पॅकेजची किंमत 24,999 रुपये निर्धारित करण्यात आली आहे.
लीक झालेल्या एका डॉक्युमेंटमधून कारच्या किमती समोर आल्या आहेत. स्कोडा स्लाव्हिया 1.0-लिटर TSI पेट्रोल व्हेरियंट अॅक्टिव्ह, अॅम्बिशन आणि स्टाइल, या तीन ट्रिम्समध्ये सादर करण्यात आले आहे. याची एक्स-शोरूम किंमत 16.19 लाख रुपये एवढी आहे.
लेटेस्ट इंटिरियर सह आलीय सेडान -
प्रीमियम मिडसाईज सेगमेंट सेडानमध्ये नव्या संकल्पनेचे इंटिरियर आहे. जे नव्या डिझाइनसह सर्वच नव्या स्कोडा कारमध्ये दिसत आहे. यात, स्पेशल गोल एअर व्हेंट्स, कॉन्ट्रास्ट कलर्समध्ये आडव्या डेकोरेटिव्ह पट्ट्या आणि अशाच प्रकारच्या अनेक नव्या भागांचाही समावेश आहे. कुशक SUV नंतरची स्लाव्हिया ही इंडिया 2.0 प्रोजेक्ट अंतर्गत सादर करण्यात आलेली दुसरी कार आहे.