दिवाळीच्या मुहूर्तावर लॉन्च झाली आणखी एक ढासू SUV; किंमत फक्त एवढी, पण फीचर्स खूप सारे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 04:59 PM2022-10-24T16:59:39+5:302022-10-24T17:08:02+5:30

ग्लोबल एनसीएपीने हिला नुकतीच 5-स्टार सेफ्टी-रेटिंग दिली आहे...

skoda kushaq anniversary edition launch know about the price and features | दिवाळीच्या मुहूर्तावर लॉन्च झाली आणखी एक ढासू SUV; किंमत फक्त एवढी, पण फीचर्स खूप सारे

दिवाळीच्या मुहूर्तावर लॉन्च झाली आणखी एक ढासू SUV; किंमत फक्त एवढी, पण फीचर्स खूप सारे

googlenewsNext

स्कोडाने अपली मिडसाइज एसयूव्ही कुशाकचे (Skoda Kushaq) अ‍ॅनिव्हर्सरी एडिशन लॉन्च केल्याचे वृत्त आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, या एसयूव्हीची सुरुवातीची किंमत 15.59 लाख रुपये आहे. ही एसयूव्ही 4 व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. या एसयूव्हीचे प्रत्येक व्हेरिअंट, हिच्या रेग्युलर मॉडल प्रमाणे व्हेरिअंटच्या तुलनेत 30,000 रुपयांनी महाग आहे. टॉप-ऑफ-द-लाइन स्कोडा कुशाकच्या या एडिशनची किंमत 19.09 लाख रुपये एवढी आहे. अर्थात, हिच्या अ‍ॅनिव्हर्सरी एडिशनची किंमत 15.59 लाख रुपयांपासून सुरू होऊन 19.09 लाख रुपयांपर्यंत जाते.

स्कोडा कुशाक अ‍ॅनिव्हर्सरी एडिशनच्या सर्व व्हेरिअंट्सच्या किंमती -
-- Style 1.0 TSI MT- 15.59 लाख रुपये
-- Style 1.0 TSI AT- 17.29 लाख रुपये
-- Style 1.5 TSI MT- 17.49 लाख रुपये
-- Style 1.5 TSI DCT- 19.09 लाख रुपये

कुशाक अ‍ॅनिव्हर्सरी एडिशनचे फीचर्स -
कुशाक अ‍ॅनिव्हर्सरी एडिशन स्टॅन्डर्ड मॉडेल प्रमाणेच बॉडी पेंट ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आली आहे. हिला सी-पिलर आणि स्टिअरिंग व्हीलवर स्पेशल 'अ‍ॅनिव्हर्सरी एडिशन' बॅजिंग देण्यात आले आहे. यात नवे कँट्रास्ट स्टिचिंग, डोअर-एज प्रोटेक्टर आणि दरवाज्यांवर थोडा क्रोम एलिमेंट देण्यात आला आहे. फीचर्ससंदर्भात बोलायचे झाल्यास स्कोडा कुशाक अ‍ॅनिव्हर्सरी एडिशनमध्ये 10 इंचाचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम देण्यात आले आहे. हे अ‍ॅप्पल कारप्ले आणि वायरलेस अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करते. यात ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि रेन-सेंसरिंग वायपरही देण्यात आले आहे.

कुशाक अ‍ॅनिव्हर्सरी एडिशनचे सेफ्टी फीचर्स आणि इंजिन ऑप्शन्स -
प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेत या एसयूव्हीमध्ये 6 एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ईएससी) आणि ट्रॅक्शन कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. ग्लोबल एनसीएपीने हिला नुकतीच 5-स्टार सेफ्टी-रेटिंग दिली आहे. या कारमध्ये क्रूझ कंट्रोलही देण्यात आले आहे. ही कार दोन इंजिनच्या पर्यायांसह येते. हिला 1.0-लिटर, 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1.5-लीटर 4-सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिन आहे.

Web Title: skoda kushaq anniversary edition launch know about the price and features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.