Skoda Slavia भारतात होणार लाँच, Honda City आणि Maruti Ciaz ला देणार टक्कर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 09:32 AM2021-11-01T09:32:48+5:302021-11-01T09:35:07+5:30

Skoda Slavia launch Update: भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यानंतर स्कोडाची स्लाव्हिया ही होंडाची प्रसिद्ध सिडान कार होंडा सिटी आणि मारुतीच्या सियाझ यांना टक्कर देऊ शकते, असे म्हटले जात आहे.

Skoda Slavia Compact Sedan To Be Unveiled In India On November 18 | Skoda Slavia भारतात होणार लाँच, Honda City आणि Maruti Ciaz ला देणार टक्कर!

Skoda Slavia भारतात होणार लाँच, Honda City आणि Maruti Ciaz ला देणार टक्कर!

Next

Skoda Slavia launch Update: चेक प्रजासत्ताकमधील आघाडीची वाहन निर्मिती कंपनी स्कोडा भारतात आपल्या आगामी स्लाव्हिया सिडान कारवरून (Skoda Slavia) बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. स्कोडाची ही कार या महिन्यात भारतीय बाजारात दाखल होणार आहे. कंपनीने जाहीर केले आहे की, नवीन स्लाव्हियाचे अधिकृतपणे 18 नोव्हेंबर रोजी अनावरण केले जाईल. दरम्यान, याआधी स्लाव्हिया सिडान कारचे अधिकृत टीझरचे फोटो समोर आले आहेत. चला तर जाणून घेऊया, या कारची खासियत... (Skoda Slavia Compact Sedan To Be Unveiled In India On November 18)

Kushaq आणि Taigun SUV प्लॅटफॉर्मवर तयार होणार 
स्कोडा स्लाव्हियाची लांबी 4,541 मिमी, रुंदी 1,752 मिमी आणि उंची 1,487 मिमी आहे. ही सेडान 2,651 मिमीच्या व्हीलबेससह येईल. डायमेंशनच्या आकडांनुसार, स्लाव्हिया आपल्या सेंगमेंटमधीस सर्वात रुंद कार असेल आणि यामध्ये सेगमेंटचा सर्वात लांब व्हीलबेस देखील असेल. कंपनीने हे MQB-A0-IN प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे, जे नवीन पिढीच्या Skoda आणि Volkswagen कार जसे की Kushaq आणि Taigun SUVs शेअर करते. स्लाव्हियाला भारतातील कार निर्मितीच्या लोकप्रिय सेडान रॅपिडची रिप्लेसमेंट म्हणून ओळखली जाते.

दोन इंजिनचा मिळेल पर्याय 
दरम्यान, चेक प्रजासत्ताकमधील आघाडीची वाहन निर्मिती कंपनी स्कोडाने आपल्या नवीन स्लाव्हिया कारबाबत अधिक माहिती उघड केली नाही. मात्र, या कारमध्ये दोन TSI पेट्रोल इंजिनसह सुसज्ज असल्याची पुष्टी केली आहे. ज्यामध्ये 1.0-लिटर तीन-सिलिंडर TSI इंजिन 115 hp पॉवर निर्माण करण्यास सक्षम आहे. तसेच, 1.5-लिटर चार-सिलिंडर TSI चे आऊटपुट 150  hp पर्यंत करेल.

या इंजिनांसह, ही स्कोडा कार 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सने सुसज्ज असेल. मात्र, एक ऑटोमॅटिक किंवा सात-स्पीड DSG गिअरबॉक्स देखील पर्याय म्हणून समाविष्ट केला जाऊ शकतो. दरम्यान, भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यानंतर स्कोडाची स्लाव्हिया ही होंडाची प्रसिद्ध सिडान कार होंडा सिटी आणि मारुतीच्या सियाझ यांना टक्कर देऊ शकते, असे म्हटले जात आहे.

Web Title: Skoda Slavia Compact Sedan To Be Unveiled In India On November 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.