... तर दहा हजार दंड भरण्याची तयारी ठेवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 06:40 AM2022-07-30T06:40:05+5:302022-07-30T06:40:58+5:30
वाहन चालविताना मोबाइलवर बोलू नका
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : सुधारित मोटार वाहन कायद्यानुसार गाडी चालविताना मोबाइलवर बोलल्यास पहिल्या वेळी ५०० रुपये, तर दुसऱ्या वेळी १० हजार रुपयांचा दंड आकारला जात आहे. हा नवीन नियम सुरू झाल्यापासून रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा पकडलेल्या २५ जणांकडून ५७ हजारांचा दंड वसूल केला आहे.
वाहन चालविताना शरीराचे सर्व अवयव वाहतुकीच्या नियमात अधिनस्त राहून वाहन चालविण्याचे काम करायला हवे, परंतु अनेक लोक वाहन चालविताना वारंवार मोबाइलचा वापर करतात. मोबाइलवर बोलण्याच्या नादात अपघात होतो.
१वाहन चालविताना मोबाइलवर बोलताना पहिल्या वेळी ५०० रुपये दंड आकारला जातो.
२ वाहन चालविताना तीच व्यक्ती पुन्हा दुसऱ्या वेळी मोबाइलवर बोलताना आढळली तर १० हजार रुपये दंड आकारण्यात येतो.
मोबाईलवर बोलताना लक्ष विचलित होते. परिणामी, अपघात होण्याची शक्यता अधिक असते. वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे हे अत्यंत धोकादायक असून, जिवाची पर्वा करण्यासाठी वाहन चालविताना मोबाइलवर बोलू नये.
वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळणे गरजेचे आहे. वाहन मर्यादित वेगात चालविणे, तसेच वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन सर्वांनी केल्यास अपघाताला आळा बसेल. परिणामी प्राणहानी होणार नाही. वाहतूक नियम तोडल्यास वाहन चालकाला कारवाईस सामोरे जावे लागेल.
- सुवर्णा पत्की, पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस.
अपघाताची शक्यता वाढते
वाहन चालविताना मोबाइलवर बोलल्यास बोलण्याच्या नादात वाहनावरील संतुलन बिघडते. परिणामी, अपघात होतात.