सोनी वाहन निर्मिती क्षेत्रात उतरली; होंडासोबत मिळून Afeela 1 ईलेक्ट्रीक कार लाँच केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 10:52 IST2025-01-07T10:52:33+5:302025-01-07T10:52:53+5:30
ही कार होंडा जपानमध्ये निर्माण करणार असून जगभरात ती विकली जाणार आहे. जॉईंट व्हेंचरमध्ये निर्माण केलेली ही पहिलीच कार आहे.

सोनी वाहन निर्मिती क्षेत्रात उतरली; होंडासोबत मिळून Afeela 1 ईलेक्ट्रीक कार लाँच केली
होंडा आणि सोनी या दोन बलाढ्य कंपन्यांनी ईलेक्ट्रीक कार विकसित केली आहे. अफिला १ असे या कारचे नाव असून या कारची रेंज ४८३ किमी असल्याचे सांगण्यात आले आहे. ही कार होंडा जपानमध्ये निर्माण करणार असून जगभरात ती विकली जाणार आहे. जॉईंट व्हेंचरमध्ये निर्माण केलेली ही पहिलीच कार आहे.
Afeela 1 इलेक्ट्रिक कार अमेरिकेतील लास वेगासमधील कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये लाँच करण्यात आली आहे. या कारचे दोन व्हेरिअंट असून ही कार ७७ लाख रुपयांपासून सुरु होते. सध्या या कारची बुकिंग विंडो कॅलिफोर्नियाच्या ग्राहकांसाठी खुली करण्यात आली असून टप्प्या टप्प्याने ही कार इतर बाजारांतही उपलब्ध केली जाणार आहे.
होंडाच्या इलेक्ट्रीक कार ज्या प्लॅटफॉर्मवर बनविण्यात आल्या आहेत त्याच प्लॅटफॉर्मवर ही कार विकसित करण्यात आली आहे. या कारमध्ये ड्युअल इलेक्ट्रीक मोटर असून ४८२ बीएचपीची ताकद पुरविते. अफीला १ मध्ये ९१ kWh लिथिअम आयन बॅटरी पॅक आहे. ही बॅटरी 150kW च्या फास्ट चार्जरने चार्ज करता येणार आहे. ही कार टेस्लाच्या सुपरचार्जचा वापर करूनही चार्ज होऊ शकते, असे दोन्ही कंपन्यांनी म्हटले आहे.