80 च्या स्पीड़ला की 100 च्या? कोणत्या वेगात जास्त मायलेज मिळते... अनेकांना पडलेला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 05:53 PM2024-08-29T17:53:24+5:302024-08-29T17:53:41+5:30
शहरी भाग सोडता अन्य भागात हा वेग पकडणे सहज शक्य आहे. वाहन एका वेगात ठेवण्याचा प्रयत्न करावा. यामुळे इंधन कमी लागेल आणि वाहनाची लाईफही वाढेल.
जर तुम्हाला तुमच्या वाहनाकडून चांगले मायलेज हवे असेल तर तुम्हाला एका ठराविक वेगाने कार, बाईक चालवावी लागणार आहे. प्रत्येकाचे मायलेज वेगवेगळे येते. कारण प्रत्येकाची वाहन चालविण्याची पद्धत वेगवेगळी असते. परंतू आम्ही तुम्हाला एक असा वेग सांगणार आहोत जो तुम्हाला तुमच्या कारचे सर्वाधिक मायलेज देण्यासाठी मदत करणार आहे.
जर तुम्हाला बंपर मायलेज हवे असेल तर तुम्हाला तुमचे वाहन 50-70 किमी/तास या वेगाने न्यावे लागणार आहे. या वेगात असताना तुमचे वाहनाचे इंजिन चांगले काम करते, यामुळे इंधन कमी लागते. या वेगात असताना कारच्या इंजिनवर कमी दबाव पडतो, यामुळे अधिक ताकद लावावी लागत नाही. याचसोबत अचानक ब्रेकिंग आणि वाहन अॅक्सरलेट करण्यापासूनही वाचावे. जेणेकरून जादाचे इंधन जाळले जात नाही.
शहरी भाग सोडता अन्य भागात हा वेग पकडणे सहज शक्य आहे. वाहन एका वेगात ठेवण्याचा प्रयत्न करावा. यामुळे इंधन कमी लागेल आणि वाहनाची लाईफही वाढेल.
चांगल्या मायलेजसाठी तुम्ही या काही गोष्टींकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. यात टायरमध्ये हवेचे योग्य प्रेशर, वेळेवर सर्व्हिसिंग आणि मेन्टेनन्स, एसी, म्युझिक सिस्टीम किंवा लाईट सारखी उपकरणे बंद ठेवणे, गरजेपेक्षा जास्तीचे वजन न ठेवणे, चांगले इंधन आदी गोष्टींची काळजी घेतल्यास कमी इंधन लागते.