Ford च्या या नव्या कारची बुकिंग सुरू, जाणून घ्या कधी होणार लॉन्च!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 05:23 PM2018-03-28T17:23:34+5:302018-03-28T17:23:34+5:30
Ford Freestyle या कारचे फोटो समोर आले असून हे....
नवी दिल्ली - प्रसिध्द कार निर्माता कंपनी Ford India लवकरच एक क्रॉसओव्हर कार भारतीय बाजारात उतरवणार आहे. Ford Freestyle असं नाव या कारला देण्यात आलंय. सध्या Ford Freestyle या कारची बुकिंग कंपनीच्या काही निवडक डिलरशिपवर सुरू करण्यात आली आहे. ही कार एप्रिल महिन्यात लॉन्च केली जाऊ शकते.
Ford Freestyle या कारचे फोटो समोर आले असून हे फोटो तामिळनाडूतील एका शोरूममधील आहेत. कार शोरूममध्ये बघायला मिळाल्याने आता कार लवकरच लॉन्च केली जाईल असा अंदाज लावण्यात येत आहे. या कारमध्ये काही नवीन फीचर्स देण्यात आले आहेत.
Ford Freestyle या कारमध्ये एलईडी हेडलॅम्प, डे-टाईम रनिंग लाईट, फॉग लॅम्प, ऑल ब्लॅक ORVM, इंटिग्रेटेड सिग्नल लाईट, रूफ रेल असे फीचर्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये 3 सिलेंडर 1.2 लिटर Ti-VCT पेट्रोल इंजिन लावण्यात आलं आहे. हे इंजिन 94 एचपीची पॉवर आणि 120 एनएमचा टार्क निर्माण करतं.
यासोबतच कारच्या डिझेल व्हर्जनमध्ये 1.5 लिटर, 2 सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 99 एचपीची पॉवर जनरेट करणार. तर इंजिनला 5 स्पीड गिअरबॉक्स लावण्यात आला आहे. Ford Freestyle कारच्या इंटेरीअरला ब्लॅक आणि ग्रे रंग देण्यात आलाय.
तसेच मनोरंजनासाठी या कारमध्ये पॉप-आऊट स्टाईल इन्फोटेन्मेट सिस्टम लावण्यात आलीये, ज्यात अॅपल कार प्ले आणि अॅंन्ड्रॉईड ऑटोची सुविधाही असेल.