धक्कादायक...फियाटची ही नवी कार असुरक्षित; "Zero" रेटींग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 11:55 AM2018-12-07T11:55:00+5:302018-12-07T11:55:29+5:30
इटलीची कार निर्माता कंपनी फियाट ग्राहकांच्या जिवाशी खेळत आहे.
नवी दिल्ली : इटलीची कार निर्माता कंपनी फियाट ग्राहकांच्या जिवाशी खेळत आहे. फियाटची परदेशात लोकप्रिय ठरलेली कार 2018 Fiat Panda सुरक्षेच्या मानांकनात सपशेल अपयशी ठरली असून Euro NCAP तपासणीमध्ये शून्य स्टार मिळाला आहे. हा आजपर्यंतचा सर्वात खराब परफॉर्मन्स आहे.
Fiat Panda ही कार अद्याप भारतात आलेली नसली तरीही परदेशात या कारचा खप मोठा आहे. भारतासाठी करण्यात येणाऱ्या NCAP टेस्ट पेक्षा युरोपसाठीची क्रॅश टेस्ट कठीण पातळ्यांवर केली जाते. यामुळे भारतीय मॉडेलला किमान 2 स्टार मिळण्य़ाची शक्यता आहे. तरीही युरोप NCAP मध्ये ही कार प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सपशेल अपयशी ठरल्याने कंपनीला विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
Euro NCAP क्रॅश टेस्टमध्ये पुढील बाजुने अपघात, समोरून अपघात, पादचारी अलर्ट ब्रेक आदी तपासण्या घेण्यात आल्या. यापैकी भारतामध्ये पादचारी अलर्ट ब्रेक ही चाचणी घेण्यात येत नाही. Fiat Panda कंपार्टमेंट फ्रंटल ऑफ टेस्ट मध्ये स्टेबल होती. मात्र, बॉडी दबण्याचे प्रमाण मोठे होते. ढोपर आणि जांघेच्या हाडाच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. मात्र, डोके आणि गळ्याची सुरक्षेची काळजी घेण्यात आलेली नाही. तसेच या कारमध्ये ऑटोनॉमस ब्रेकिंग सिस्टिम और लेन असिस्टेंट तंत्रज्ञानाचाही अभाव आहे.