महिंद्रा अन् मारुतीची दमदार टक्कर...थार वि. जिम्नी!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 08:53 AM2023-01-22T08:53:31+5:302023-01-22T08:54:15+5:30
ऑटो एक्सपो २०२३ मध्ये मारुती सुझुकीने आपली बहुप्रतिक्षित ऑफरोडर एसयूव्ही मारुती जिम्नी सादर केली. थार या महिंद्राच्या दमदार एसयूव्हीसोबत जिम्नीची स्पर्धा असेल. लूक, डिझाइन आणि फिचर्समध्येही दोन्ही गाड्या एकमेकांना टक्कर देतील.

इंजिन आणि पॉवर
थारमध्ये १.५ लीटर डिझेल, २.२ लीटर डिझेल आणि २.० लीटर पेट्रोल असे तीन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. यात 4X4 ड्राइव्ह आणि रिअर व्हील ड्राइव्ह (4X2) ची सुविधा मिळते, तर जिम्नीमध्येही 4X4 ड्राइव्हची सुविधा मिळते, पण फक्त १.५ लीटर पेट्रोल इंजिनचाच पर्याय मिळतो.
डायमेन्शन :महिंद्रा थार ३ डोअर व्हर्जनदेखील ५ डोअर जिम्नीपेक्षा लांब व रुंद दिसते. दोन्हीची लांबी जवळपास समान आहे. महिंद्रा थार ३,९८५ मिमी लांब, १,८५५ मिमी रुंद तर १.८४४ मिमी उंच आहे. जिम्नी ३,९८५ मिमी लांब, १,६४५ मिमी रुंद व १,७२० मिमी उंच आहे. ५ दरवाजांमुळे जिम्नीचा व्हीलबेस थारपेक्षा १४० मिमी लांब आहे. थारमध्ये ग्राउंड क्लिअरन्स १६ मिमी जास्त आहे. थारची वॉटर-वॅडिंग क्षमता ६२५ मिमी आहे, तर जिम्नीची क्षमता समजू शकलेली नाही.
किंमत : मारुती जिम्नी भारतात मार्च २०२३ मध्ये १० ते १२.५० लाख रुपयांच्या अंदाजे किंमत श्रेणीसह लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. महिंद्रा थारची किंमत ९.९९ ते १६.२९ लाख रुपये आहे.