Sunroof धावत्या कारमधून बाहेर निघण्यासाठी नसते, बहुतांश लोकांना याचा वापरच माहीत नाही! जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 06:38 PM2023-03-29T18:38:31+5:302023-03-29T18:39:48+5:30
advantages and disadvantages of sunroof : लोक अनेक वेळा सनरूफमधून बाहेर येत मस्ती करताना दिसतात. हे योग्य नाही. हे धोकादायक आहे.
आजकाल सनरूफ हे कारच्या विक्रीत महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. ग्राहकही कार निवडताना आता सनरूफचा विचार करतात. मात्र, सनरूफ असलेली कार खरेदी केल्यानंतर, अनेकजण सनरूफचा गैरवापर करताना दिसतात. खरे तर, सनरूफचा खरा उपयोग काय? हेच त्यांना माहीत नसते.
धावत्या कारमध्ये सनरूफच्या बाहेर निघत मस्ती करताना आपण अनेकांना पाहिले असेल. एवढेच नाही, तर अनेक वेळा मुलेही सनरूफच्या बाहेर निघत चालत्याकारमध्ये मस्ती करताना आपण पाहिले असतील. पण, कारमध्ये या गोष्टींसाठी सनरूफ दिले जाते का?
कारमध्ये कशासाठी असते सनरूफ? -
- सनरूफचा सर्वात पहिला फायदा म्हणजे, यामुळे कारमध्ये नैसर्गिक प्रकाश येऊ शकतो. आपल्याला केवळ विंडो ग्लासमधून तेवढा प्रकाश मिळत नाही.
- सनरूफच्या माध्यमाने कार लवकरात लवकर थंड केली जाऊ शकते. जर आपली कार उन्हात उभी असेल, तर थोड्या वेळासाठी सनरूफ ओपन करून ती लवकर थंड केली जाऊ शकते.
- कारमध्ये सनरूफ असल्यास आपल्याला मोकळे वाटते. यामुळे आपल्याला कारचे केबीन प्रेशियस वाटते.
कधीच करू नका अशी चूक -
लोक अनेक वेळा सनरूफमधून बाहेर येत मस्ती करताना दिसतात. हे योग्य नाही. हे धोकादायक आहे. मुलांनी कितीही त्रास दिला तरी त्यांना सनरूफ बाहेर नुघू देऊ नका. कारण एखाद वेळा इमरजन्सी ब्रेक लावण्याची वेळ आली, तर सनरूफच्या बाहेर निघालेल्या मुलाला अथवा कुण्याही व्यक्तीला इजा होऊ शकते. हे जीवघेणेही ठरू शकते. एवढेच नाही, तर हार्ड ब्रेकिंगदरम्यान सनरूफबाहेर निघालेली व्यक्ती कार बाहेरही फेकली जाऊ शकते.