रॉयल एनफिल्डकडून Super Meteor 650 ची किंमत जाहीर; जाणून घ्या सर्व व्हेरिएंटची किंमत व कलर ऑप्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 03:12 PM2023-01-17T15:12:30+5:302023-01-17T15:12:53+5:30

Super Meteor 650 Price : तीन व्हेरिएंटसह सादर करण्यात आली आहे, ज्यांची किंमत स्वतंत्रपणे निश्चित करण्यात आली आहे.

Super Meteor 650 Price Declared Know Variant Wise Price Color Option And Engine Details | रॉयल एनफिल्डकडून Super Meteor 650 ची किंमत जाहीर; जाणून घ्या सर्व व्हेरिएंटची किंमत व कलर ऑप्शन

रॉयल एनफिल्डकडून Super Meteor 650 ची किंमत जाहीर; जाणून घ्या सर्व व्हेरिएंटची किंमत व कलर ऑप्शन

googlenewsNext

नवी दिल्ली : रॉयल एनफिल्डने (Royal Enfield) दीर्घ प्रतीक्षेनंतर आपल्या नवीन क्रूझर बाईक Super Meteor 650 च्या किमती जाहीर केल्या आहेत. ही बाईक तीन व्हेरिएंटसह सादर करण्यात आली आहे, ज्यांची किंमत स्वतंत्रपणे निश्चित करण्यात आली आहे.

व्हेरिएंट काय आहेत?
रॉयल एनफिल्डने या बाईकचे तीन व्हेरिएंट बाजारात लाँच केले आहेत, ज्यात पहिले व्हेरिएंट Super Meteor 650 Astral, दुसरे व्हेरिएंट Super Meteor 650 Interstellar आणि तिसरे व्हेरिएंट Super Meteor 650 Celestial आहे.

किंमत किती?
रॉयल एनफिल्डने (Royal Enfield) सुपर मेटिअर 650 ची किंमत आपल्या व्हेरिएंटच्या आधारावर निश्चित केली आहे. Super Meteor 650 Astral ची किंमत 3.48 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. Super Meteor 650 Interstellar ची किंमत 3.63 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) आहे. Super Meteor 650 Celestial ची किंमत 3.78 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

इंजिन आणि ट्रान्समिशन कसे आहे?
रॉयल एनफिल्डने या बाईकमध्ये गियर मॅपिंग आणि काही अपडेट्ससह तेच इंजिन वापरले आहे, जे कंपनीने आपल्या दोन सध्याच्या बाईक Royal Enfield Interceptor 650 आणि Royal Enfield Continental GT 650 मध्ये दिले आहे. या बाइकचे इंजिन 648cc पॅरलल ट्विन इंजिन आहे, जे एअर कूल्ड आणि ऑइल कूल्ड टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. हे इंजिन 47 बीएचपी पॉवर आणि 52 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

कलर ऑप्शन काय आहेत?
किमतींप्रमाणेच रॉयल एनफिल्डने व्हेरिएंटनुसार कलरचा ऑप्शनही वेगळा ठेवला आहे. ज्यामध्ये Super Meteor 650 Astral साठी ब्लू, ब्लॅक आणि ग्रीन कलर ऑप्शन ठेवण्यात आले आहेत. तर Super Meteor 650 Interstellar साठी ड्युअल टोन ऑप्शन आहे. ज्यामध्ये ग्रे आणि ग्रीन कलरचा समावेश आहे. Super Meteor 650 Celestial मध्ये देखील कंपनी ड्युअल कलर टोनचा ऑप्शन देत आहे, ज्यामध्ये रेड आणि ब्लू कलर ऑप्शन मिळेल.

ब्रेकिंग सिस्टम?
रॉयल एनफिल्डने या बाईकच्या फ्रंटला 320 एमएम डिस्क ब्रेक आणि रिअर बाजूस 300 एमएम डिस्क ब्रेक दिले आहेत, ज्यात ड्युअल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम बसवण्यात आली आहे.

Web Title: Super Meteor 650 Price Declared Know Variant Wise Price Color Option And Engine Details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.