ऑक्टोबरमध्ये वाहनविक्रीचा सुपर शो! किरकोळ विक्रीत तब्बल ४८ टक्के वाढ; ऑटोरिक्षा प्रथम स्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 07:49 AM2022-11-08T07:49:23+5:302022-11-08T07:49:36+5:30
सणासुदीचा ऑक्टोबर महिना वाहन उद्याेगासाठी अतिशय चांगला राहिला आहे.
नवी दिल्ली :
सणासुदीचा ऑक्टोबर महिना वाहन उद्याेगासाठी अतिशय चांगला राहिला आहे. या महिन्यात वाहनांच्या किरकोळ विक्रीत ४८ टक्के वाढ झाली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनने (फाडा) ही माहिती जारी केली आहे.
‘फाडा’च्या माहितीनुसार, दुचाकी वाहनांची विक्री ५१ टक्क्यांनी, तीनचाकी (ऑटोरिक्षा) वाहनांची विक्री ६६ टक्क्यांनी, प्रवासी वाहनांची विक्री ४१ टक्क्यांनी, ट्रॅक्टरची विक्री १७ टक्क्यांनी, तर व्यावसायिक वाहनांची विक्री २५ टक्क्यांनी वाढली. तीनचाकी वाहनांचे ग्राहक ईव्हीकडे स्थलांतरित होत आहेत. एसयूव्ही आणि कॉम्पॅक्ट एसयूव्हीतील विक्रीत ४१ टक्के वाढ झाली आहे.
- ऑक्टोबर २०२२ महिन्यात एकूण २०,९४,३७८ वाहनांची विक्री
- ऑक्टोबर २०२१ मध्ये १४,१८,७२६ वाहनांची विक्री
२८% सणासुदीच्या काळात वाढ
- यंदाच्या ४२ दिवसांच्या सणासुदीच्या हंगामात वाहन विक्री वार्षिक आधारावर २८ टक्क्यांनी वाढली. हा चार वर्षांचा उच्चांक आहे.
- यात दुचाकी विक्री २७ टक्के, तीनचाकी विक्री ६८ टक्के, प्रवासी वाहनांची विक्री ३५ टक्के, ट्रॅक्टरची विक्री ३० टक्के आणि व्यावसायिक वाहनांची विक्री २९ टक्के वाढली.