Maserati नं लॉन्च केली सुपरकार MC20, केवळ 2.9 सेकेंदात घेते तुफान स्पीड! फीचर जाणून प्रेमात पडाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 06:53 PM2023-04-01T18:53:55+5:302023-04-01T18:55:40+5:30

Maserati कंपनी ही तिच्या जबरदस्त स्पोर्ट्स कारसाठी जगभरात प्रसिद्ध आहे आणि येथील बाजारातील फरारी, पोर्श आणि लॅम्बोर्गिनी सारख्या ब्रँड्सना टक्कर देते. 

Supercar MC20 launched by Maserati, takes stormy speed in only 2. 9 seconds You will fall in love knowing the feature | Maserati नं लॉन्च केली सुपरकार MC20, केवळ 2.9 सेकेंदात घेते तुफान स्पीड! फीचर जाणून प्रेमात पडाल

Maserati नं लॉन्च केली सुपरकार MC20, केवळ 2.9 सेकेंदात घेते तुफान स्पीड! फीचर जाणून प्रेमात पडाल

googlenewsNext

लक्झरी कार चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इटलीतील आघाडीची स्पोर्ट्स कार उत्पादक कंपनी असलेल्या Maserati ने भारतीय बाजारात आपली पावरफुल सुपरकार Maserati MC20 लॉन्च केली आहे. आकर्षक लुक आणि पॉवरफुल इंजिन असलेल्या या सुपरकारची सुरुवातीची किंमत 3.69 कोटी रुपये (एक्स-शोरूम, भारत) एवढी निश्चित करण्यात आली आहे. Maserati कंपनी ही तिच्या जबरदस्त स्पोर्ट्स कारसाठी जगभरात प्रसिद्ध आहे आणि येथील बाजारातील फरारी, पोर्श आणि लॅम्बोर्गिनी सारख्या ब्रँड्सना टक्कर देते. 

खरे तर बऱ्याच दिवसांपासून Maserati MC20 ची प्रतीक्षा केली जात होती. यापूर्वी ही कार 2022 मध्ये लॉन्च होण्याचा अंदाज होता. मात्र उशिराका होईना ही कार भारतीय रस्त्यांवर धावण्यासाठी आली आहे. डिलरशिप सोर्सेसच्या हवाल्याने, मिडिया रिपोर्ट्सनुसार या कारच्या पहिल्या युनिटची डिलिव्हरी मे महिन्यात होऊ शकते. जाणून घेऊयात कारची खासियत.. 

Maserati MC20 ची पॉवर आणि परफॉर्मन्स -
कंपनीने या कारमध्ये 3.0 लिटर क्षमतेचे पॉवरफूल ट्विन-टर्बोचार्ज V6 इंजिन वापरले आहे. हे इंजिन 630hp पॉवर आणि 730Nm चा टॉर्क जनरेट करते. महत्वाचे म्हणजे, हे इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडले गेले आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार केवळ 2.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास एवढा स्पीड घेऊ शकते आणि तिची टॉप स्पीड 325 किमी प्रतितास एवढी आहे.

Maserati MC20 वर एक नजर - 
इंजिन : 3.0 लिटर V6
पिक-अप : 2.9 सेकेंदात 0 ते 100Kmph
टॉप स्पीड : 325 किलोमीटर प्रति तास
किंमत : 3.69 कोटी रुपये 
 
या कारमध्ये 10 इंचांचा डिजिटल इंस्ट्रूमेंट डिस्प्ले आणि 10 इंचांचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम देण्यात आले आहे. तसेच कार्बन फायबरने झाकलेल्या सेंट्रल कंसोलमध्ये केवळ ड्राइव्ह मोड सिलेक्टर, एक वायरलेस स्मार्टफोन होल्डर, इंफोटेनमेंट कंट्रोल आणि काही इतर छोटे फंक्शन्स देण्यात आले आहे.

Web Title: Supercar MC20 launched by Maserati, takes stormy speed in only 2. 9 seconds You will fall in love knowing the feature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.