आश्चर्य...ई-हायवेवर धावू लागले ट्रक; मुंबई-दिल्ली मार्गाची उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 12:45 PM2019-05-09T12:45:04+5:302019-05-09T12:47:53+5:30
भारतात मुंबई-दिल्लीसाठी ई-हायवे तयार करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती.
फ्रँकफर्ट : भारतात इलेक्ट्रीक वाहनांसाठी प्रयत्न सुरु असताना तिकडे जर्मनीमध्ये ट्रकही विजेवर धावू लागले आहेत. जर्मनीमध्ये फ्रँकफर्ट विमानतळ आणि औद्योगीक पार्कमध्ये तब्बल 544 कोटी रुपये खर्चून 10 किमीचा ई हायवे तयार करण्यात आला आहे. आपल्याकडील विजेवर चालणारी ट्रेनसारखेच वरती लावलेल्या वीजतारांमधील वीज घेऊन ट्रकही धावणार आहेत.
भारतात मुंबई-दिल्लीसाठी ई-हायवे तयार करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. यासाठी एक वेगळी लेन बनविण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, जर्मनीमध्ये वीजेवर चालणारे ट्रक चालविण्यात येत आहेत. जर्मनीमध्ये या 10 किमीच्या रस्त्याची नुकतीच चाचणीही घेण्यात आली होती.
हे तंत्रज्ञान सिमेन्स कंपनीने विकसित केले आहे. ट्रकमुळे होणारे प्रदुषण दूर करण्यासाठी या प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. ट्रकांमध्ये मोटार लावण्यात आली आहे. जी रेल्वेसारख्या ओव्हरहेड वायरमधून वीज घेणार आहे. या वीजेवर हा अवजड ट्रकला 90 किमी प्रतितास वेगाने धावू शकतो.
सिमेन्सने केलेल्या दाव्यानुसार हे तंत्रज्ञान डिझेलच्या ट्रकपेक्षा जास्त प्रमाणात ऊर्जा वाचविते. वीजेवर चालविण्यात येणाऱ्या ट्रकमुळे वर्षभरात 16 लाख रुपये वाचणार आहेत. याशिवाय कार्बन डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइडचे उत्सर्जनही कमी होणार आहे. जेथे ई हायवे नसेल तेथे हे ट्रक डिझेस इंजिनावर चालणार आहेत. सरकारने अशा प्रकारचे ट्रक बनविण्यासाठी 536 कोटी रुपये गुंतविले आहेत.